१८ ते ४४ वयोगटांसाठी महापालिकेचा स्वखर्चाने लसीकरणाचा प्रयत्न : महापौर

vaccination
vaccinationesakal
Updated on

नाशिक : लशींच्या तुटवड्यामुळे (vaccination shortage) शासनाने १८ ते ४४ वयोगटांसाठीची लसीकरण मोहीम (drive vaccaination) थांबली असली तरी कोरोना संसर्गाच्या (coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या वतीने या वयोगटांतील पाच लाख युवकांना लस देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात महापौर व आयुक्त यांच्यात चर्चा सुरू आहे. (Municipal Corporation attempt to vaccination at its own cost)

महापौर व आयुक्त यांच्यात चर्चा सुरू

सकारात्मक निर्णय झाल्यास केंद्र किंवा राज्य शासनावर अवलंबून न राहता महापालिका स्वखर्चाने लसीकरण करून राज्यात एक नवा आदर्श निर्माण करू शकतो. १६ जानेवारीपासून नाशिक शहरांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मोहिमेला अनेक कारणांमुळे ब्रेक लागला आहे. नाशिक शहरामध्ये कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनपैकी कोव्हिशील्ड लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही मिळून सव्वादोन लाखांचा आकडा पार झाला आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे आता फक्त ४५ वयोगटांतील पुढील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यातही दुसरा डोस शिल्लक असलेल्या व्यक्तींनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे वीस लाख लोकसंख्येचे लसीकरण कधी पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे.

vaccination
रुग्णसंख्या घटली तरी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा मात्र कायम

स्वतंत्र लसीकरण मोहीम

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यापूर्वीच लसीकरण होणे गरजेचे असल्याने केंद्र किंवा राज्य शासनाच्या लशींची वाट न पाहता महापालिका यांच्या वतीने स्वखर्चाने लसीकरण करता येईल का, याबाबत विचारविनिमय सुरू असून, सोमवारी या संदर्भात महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांच्यात चर्चा होणार आहे. दोघांची संमती मिळाल्यास नाशिक शहरामध्ये महापालिकेच्या वतीने १८ ते ४४ व योगासन गटासाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

vaccination
१५ जूनपासून भरणार वरिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()