नाशिक : चार-पाच दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात पाऊस पडत असल्याने पन्नास टक्क्यांच्या वर पाणीसाठा झाला आहे. धरणात पाणीसाठा होत असला तरी भविष्याची गरज लक्षात घेऊन किमान महिनाभर म्हणजे आठवड्यातून एक दिवस असे एकूण चार दिवस पाणीपुरवठा कपात कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले. (Municipal Corporation decides to cut water in Nashik despite rains)
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरण परिसरात पाऊस न पडल्याने आरक्षित पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली. राज्यात सर्वदूर पाऊस असला तरी नाशिक शहर व जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शिल्लक पाणीसाठ्याचा आढावा दोन आठवड्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार दर बुधवारी संपूर्ण दिवस पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. बकरी ईद असल्याने गेल्या आठवड्यात गुरुवारी पाणीकपात करण्यात आली. या आठवड्यापासून नियमित दर बुधवारी संपूर्ण दिवस पाणीकपात होणार आहे. गुरुवारनंतर धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात चार लाख ८६७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा तयार झाला असून, ४८ टक्के प्रमाण आहे. मुकणे धरणात ददोन हजार ९६६ दशलक्ष घनफूट पाणी असून, हे प्रमाण ४१ टक्के आहे. दारणा धरण पूर्ण भरले असले तरी सध्या अळीयुक्त पाणी असल्याने येथून पाणी उचलले जात नाही. पाणीकपातीचा निर्णय घेताना प्रकल्प पन्नास टक्के भरली तरी कपात मागे घेतली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे धरणे भरत असताना शहरात लागू करण्यात आलेली कपात मागे घेतली जाईल, असे अपेक्षित होते. परंतु पावसात खंड पडल्यास पुन्हा टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कपातीचा घेतलेला निर्णय किमान महिनाभर कायम ठेवला जाईल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. त्यामुळे ऑगस्टच्या मध्यापर्यंत तरी आठ दिवसांतून एकदा नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक साठा
गंगापूर धरणसमूहात गेल्या वर्षी २४ जुलैपर्यंत तीन हजार ७८८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. या वर्षी चार हजार ८६७ दशलक्ष घनफूट पाणी साचले आहे. मुकणे धरणात एक हजार ९७७ दशलक्ष घनफूट पाणी गेल्या वर्षी होते. या वर्षी दोन हजार ९७७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा तयार झाला आहे. दारणा धरणात गेल्या वर्षी चार हजार ३४० दशलक्ष घनफूट पाणी होते. या वर्षी पाच हजार ५७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा तयार झाला आहे.
धरण परिसरात पाऊस पडत असला तरी निरंतर पावसाबाबत साशंकता आहे. त्यामुळे एक दिवस पाणीकपातीचा घेतलेला निर्णय किमान महिनाभर कायम राहील. आढावा घेऊन निर्णय घेऊ.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
धरणांची स्थिती (दशलक्ष घनफुटात)
धरण - साठवण क्षमता - सद्यःस्थितीतील साठा
गंगापूर - ५६३० - ३२९८
काश्यपी - १८५२ ५९०
गौतमी-गोदावरी - १८६८ ६३७
आळंदी - ८१६ - ३४२
एकूण - १०,१६६ - ४,८६७
(Municipal Corporation decides to cut water in Nashik despite rains)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.