नाशिक : पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी पालिका उच्च न्यायालयात

nashik municipal corporation
nashik municipal corporationesakal
Updated on

नाशिक : शहरात डेंगी व चिकणगुनियाची साथ वाढतं असताना डास निर्मूलन मोहिमेंतर्गत शहरात जंतुनाशक, धूरफवारणी होत नसल्याने नवीन ठेका काढण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरतं असताना आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या किटकजन्य आजार फैलावत आहे. शहरात डेंगी व चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतं आहे. जुलै महिन्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या २७५ च्या वर पोहोचली असून चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या अडीचशे वर पोहोचली आहे. शहरात जंतुनाशक औषधांची फवारणी होत नसल्याने नगरसेवकांची ओरड सुरू आहे. त्यापार्श्‍वभूमीवर पेस्ट कन्ट्रोलची मागणी होत आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून जुन्या ठेकेदाराला सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. पेस्ट कंट्रोल ठेक्याची वादग्रस्त निविदा यापूर्वी रद्द करण्यात आली असून आठ महिन्यांपासून उच्च न्यायालयात वाद पोहोचला आहे. न्याय प्रविष्ट बाब असल्याचे कारण देत चाल ढकल केली जात असली तरी शहरात साथीच्या आजारांचा फैलाव होत नसल्याने स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी न्यायालयात प्रलंबित दाव्याच्या सुनावणीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना देताना पेस्ट कंट्रोलचा नवीन ठेका काढण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागून नवीन ठेका काढण्यासाठी कारवाईच्या सूचना दिल्या.

(decision to go to the High Court for a new pest control contract)

nashik municipal corporation
नाशिक : महिनाभरात डेंगीचे १९५, चिकूनगुनियाचे १८५ रुग्ण
nashik municipal corporation
…तर नाशिक, कोपरगावात चिपळूणची पुनरावृत्ती; जलतज्ज्ञ चितळेंच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.