नाशिक : विहितगाव, वडनेर आणि पिंपळगाव शिवारातील तीन गावांचा मिळून प्रभाग ४३ बनला आहे. वर्षानुवर्षे नगरसेवक विहीतगावचा की वडनेरचा, याभोवती इथले राजकारण फिरत आले आहे. या वेळी नवीन प्रभागरचना त्याला अपवाद नाही. विहीतगाव, वडनेर गावांच्या या प्रभागाला पिंपळगाव दुमाला जोडला गेल्याने गावठाणातील राजकारण कायम राहणार आहे. या राजकारणात आजी- माजी आमदारांच्या सहभागाचे वलय असणार आहे. माजी मंत्री बबन घोलप यांच्या कन्या व माजी महापौर नयना घोलप आणि त्यांच्या विरोधावर राजकारण असलेल्या सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांच्यातील पारंपरिक सत्तासंघर्ष या प्रभागात पाहायला मिळत असल्याने येथील निवडीकडे शहराचे लक्ष लागून असते. या वेळी तेच पाहायला मिळणार आहे.
प्रभागात नगरसेवक विहीतगावचा की वडनेरचा, हा कळीचा मुद्दा असणार आहे. माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे व दिवंगत नगरसेवक उत्तम हांडोरे यांच्यापासून सुरू असलेला हा संघर्ष एक तपानंतरही कायम आहेत. फरक एवढा दोन गावातील सत्ता संघर्षात चेहरे मात्र बदलले आहेत. मळे आणि वाडे, नाते- गोते आणि गावकीच्या सत्ता संघर्षाच्या लाटेत भल्याभल्यांना अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे लक्षवेधी निवडणुकांमध्ये इथल्या प्रभागाच्या राजकारणाचा समावेश होतो.
प्रभागाची व्याप्ती
विहीतगाव, सौभाग्यनगर, कोठुळेनगर, लॅम रोड, मथुरा रोड, दुमाला व पिंपळगाव हांडोरे मळा, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब गावठाण.
उत्तर- वडनेर पाथर्डी रस्त्यावर पिंपळगाव फाट्यापासून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन सर्वे क्रमांक २५४ च्या पश्चिम हद्दीपर्यंत. श्रीफार्म मार्गे उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन मिलिटरी हद्दीपर्यंत, पूर्वेकडे मिलिटरी हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन वालदेवी नदीपर्यंत. वालदेवी नदी हद्दीने पूर्वेकडे वडनेर गावठाण घेऊन दक्षिणेकडील भाग घेऊन नदीच्या हद्दीने देवळाली गावापर्यंत, पुढे अंतर्गत रस्त्याने पूर्वेकडे येऊन विरोबा महाराज मंदिरापर्यंत, अहिल्या मठ रस्त्याने लॅम रोडपर्यंत, पुढे उत्तरेकडे जाऊन मालधक्का रोडने रेल्वे लाइनपर्यंत, रेल्वे लाइनने उत्तरेकडे ३० मीटर डीपी रस्त्यापर्यंत, पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन आई माऊली चौक (खर्जुल सर्कल) पर्यंत.
पूर्व : आई माऊली चौक (खर्जुल सर्कल) पासून दक्षिणेकडे देवळाली चेहेडी शिवेने पश्चिमेकडील भाग घेऊन वालदेवी नदीपर्यंत, पश्चिमेकडे महापालिका हद्दीने रेल्वे लाइनपर्यंत.
दक्षिण : रेल्वे लाइनपासून महापालिका हद्दीने पश्चिमेकडे उत्तरे कडील भाग घेऊन पिंपळगाव खांब सर्व्हे क्रमांक ९० पर्यंत.
पश्चिम : महापालिका हद्दीवरील पिंपळगाव खांब सर्व्हे क्रमांक ९० पासून उत्तरेकडे शिव रस्त्याने बबन जाधव यांचे घर वगळून त्यांच्या घरापर्यंत व तेथून नाल्याने उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन व नंतर पश्चिमेकडे किरण जाधव यांचे घर वगळून उत्तरेकडे पिंपळगाव- वडनेर दुमाला रस्त्यापर्यंत, पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग व पिंपळगाव खांब गावठाण घेऊन वालदेवी नदीपर्यंत व वालदेवी नदी ओलांडून १८ मीटर डीपी रस्त्याने उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन वडनेर पाथर्डी रस्त्यावरील पिंपळगाव फाट्यापर्यंत.
हे आहेत इच्छुक
केशव पोरजे, सुनीता कोठुळे, जगदीश पवार, नयना घोलप, वैशाली दाणी, साहेबराव खर्जुल, विक्रम कोठुळे, ॲड. अरविंद गायकवाड, धनाजी कोठुळे, अमोल आल्हाट, प्रतिभा नारद, भारत निकम, राम पठारे, विश्वनाथ भालेराव, शरद गायकवाड, शारदा गिरजे, शाहीद शेख, संजय हांडोरे, संतोष गिरजे, समाधान कोठुळे, हेमंत नारद, प्रभाकर पाळदे, संजय पोरजे, अन्सार शेख, प्रशांत अरिंगळे, मनिषा जाधव.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.