खरेच विकासकामे की ‘इलेक्शन डिप्लोमसी’?

election
electionesakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : नाशिक पंचवार्षिक महापालिका निवडणुका (Nashik Municipal Corporation Election) जवळ येऊन ठेपल्याने आता सिडकोवासीयांसाठी विकासकामांची जणू काही लॉटरीच लागली की काय, अशा प्रकारचे चित्र बघायला मिळत आहे. मागील पाच वर्षांपासून सिडको परिसरात एकही नाव घेण्याजोगे नवीन विकासकाम पूर्ण झाले नाही. सिडकोवासीयांसाठी (CIDCO) ही एक खेदाची बाबच म्हणावी लागेल; परंतु महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येऊन ठेपत आहे तसतसे एक-एक राजकीय पक्ष विकासकामांच्या घोषणा करताना दिसून येत आहे. निवडणुकीच्या (Election) निमित्ताने का होईना नव्या कामांच्या घोषणा होत असल्याने नागरिकांमध्ये मात्र काहीसे समाधान व्यक्त होत आहे. (municipal elections approaching political leaders are announcing development works in Nashik)


दुसरीकडे राजकीय पक्ष व नेत्यांचा हा पॉलिटिकल फंडा नागरिक समजण्याइतके वेडे मात्र नक्कीच नाहीत. सुरवातीला विकासकामांची घोषणा होते. नंतर भूमिपूजन आणि त्यानंतर पाच वर्षांनी त्या कामाचे उद्‌घाटन होते. तोपर्यंत दुसरी पंचवार्षिक निवडणूक लागून जाते. असाच काहीसा वाईट अनुभव आतापर्यंत नागरिकांना आला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची ही इलेक्शन डिप्लोमसी न समजण्याइतकी जनता मूर्ख नाही, एवढे मात्र नक्की. खरोखरच विकासकामे करायची असतील तर निवडणूक लागण्याच्या दोन-तीन वर्षे अगोदर का होत नाही, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

election
नाशिक ऑक्सिजन दुर्घटना पावसाळी अधिवेशनात गाजणार



-नुकतीच पांजरपोळ येथे सिडकोचा नवीन प्रोजेक्ट उभारण्याची घोषणा.
-संभाजी स्टेडियम येथील ‘खेलो इंडिया खेलो’ प्रोजेक्ट काही महिन्यांपासून बंद.
-भाजप आमदारांचा पेलिकन पार्कच्या १७ एकर जागेत प्रोजेक्ट सुरू.
-शिवसेना महानगरप्रमुखांनी उड्डाणपुलास नुकतीच मंजुरी मिळवून आणली आहे.
-सिडकोच्या घरांना ‘फ्री टू लीज होम’ची घोषणा अद्यापही अमलात आली नाही.
-अंबड पोलिस ठाण्याच्या विभाजनासाठी जागा निश्चित होऊनही ठाणे मंजूर झाले नाही.
-केमिकल कंपन्यांमधील रसायनयुक्त दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सीईटीपी प्रॉजेक्ट सोडाच साधी ड्रेनेज लाइनदेखील नाही.
-चुंचाळे येथील महापालिका घरकुल योजनेतील काही इमारती अजूनही धूळखात.

(municipal elections approaching political leaders are announcing development works in nashik)

election
येवल्यात ग्राहकांकडे वीजबिलाचे १३० कोटी थकीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.