Jalgaon News : महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतिपदांसाठी भारतीय जनता पक्षाने अर्ज दाखल केले आहेत, तर विरोधात दोन सभापतिपदांसाठी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने अर्ज दाखल केले आहेत. (Municipal Ward Committee Chairman Election BJP Shiv Sena Shinde faction face to face jalgaon news)
मात्र, दोन्ही जागांसाठी निर्णयाची जबाबदारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने (ठाकरे गट) मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
नगरसचिव विभागात गुरुवारी (ता. २०) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना शिंदे गटातर्फे प्रभाग समिती एकसाठी नवनाथ दारकुंडे, तर प्रभाग समिती दोनसाठी रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिंदे गटाचे प्रमुख ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.
भाजपतर्फे चार अर्ज दाखल
भारतीय जनता पक्षातर्फे चारही प्रभाग समिती सभापतिपदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. ते असे : प्रभाग समिती एक- डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रभाग दोन- रंजना सपकाळे, प्रभाग तीन- अजंना सोनवणे, प्रभाग चार- विजय पाटील.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
‘एमआयएम’तर्फे एक अर्ज
महापालिकेत ‘एमआयएम’चे तीन नगरसेवक आहेत. प्रभाग तीनमध्येही तिन्ही नगरसेवक आहेत. त्यामुळे ‘एमआयएम’च्या शेख शहिदा यांनी प्रभाग तीनच्या सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सोमवारी निवड
प्रभाग समिती सभापतिपदांची निवड सोमवारी (ता. २४) होणार आहे. महापौर जयश्री महाजन पीठासीन अध्यक्ष असतील. उमेदवारी अर्ज छाननीनंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. कोणीही माघार न घेतल्यास त्या प्रभागासाठी निवडणूक घेतली जाईल.
नेत्यांचा निर्णय मान्य : ॲड. पोकळे
राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गट यांची युती आहे. मात्र, सभापतिपदांसाठी प्रभाग समिती एक व प्रभाग समिती दोनमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे एकमेकाविरोधात अर्ज आले आहेत. त्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते ॲड. दिलीप पोकळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की आमची युती आहेच.
त्यामुळे प्रभाग समिती सभापतिपदाबाबत पालकमंत्री व आमच्या पक्षाचे गुलाबराव पाटील, तर भाजपचे नेते गिरीश महाजन निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील, तो आम्हास मान्य असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.