Nashik : घरबसल्या ऑनलाइन पहा; महापालिका महिला आरक्षण सोडत

Women reservation Draw
Women reservation Drawesakal
Updated on

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC Elections) मंगळवारी (ता. ३१) सकाळी साडेदहाला महिला राखीव (Women reserved) जागांसाठी प्रभागांची आरक्षण सोडत (Reservation Draw) काढण्यात येणार आहे. सोडत ऑनलाइन (Online) होणार असल्याने इच्छुकांना घरबसल्या https://fb.me/e/6xjFDs7fl फेसबुक लिंक, https://youtube.com/c/mynmc यू ट्यूब लिंकवर पाहता येणार आहे. (Municipal women reservation draw Watch online at home Nashik News)

दरम्यान, सोमवारी (ता. ३१) महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांच्या देखरेखीखाली निवडणूक विभागाने रंगीत तालीम केली. महिला सोडत आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेच्या पथकाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात साफसफाई करून नियोजनाची तयारी केली. इच्छुक उमेदवार, येणाऱ्यांची बैठक व्यवस्था, निवडणूक कामकाज या सगळ्याचे नियोजन केले, तसेच कामकाजाचा आढावा घेण्यात आला. भाभानगरमधील महापालिकेच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी साडेदहाला सोडत होणार आहे. त्यात १३३ पैकी ५० टक्के म्हणजे ६७ महिलांच्या आरक्षणासाठी प्रभाग निश्चित होणार असून, सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती-जमाती महिला, अशा तीन संवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण काढले जाणार आहे.

Women reservation Draw
Nashik : अपुर्व अस्मरचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डंका

महापालिकेतील एकूण जागेच्या ५० टक्के महिला राखीव जागांसाठी प्रभागनिहाय सोडत काढली जाणार आहे. महिला आरक्षण सोडतीवर अनेक इच्छुकांचे भवितव्य ठरणार असल्याने पक्षांच्या इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे चिठ्ठीच अनेकांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहे. सोडती दरम्यान कुणी गोंधळ करायला नको, म्हणून पोलिस बंदोबस्तसाठी महापालिकेने सोय केली आहे.

Women reservation Draw
नाशिक : ग्रामीण भागातील जुने कोंडवाडे पडद्याआड

६७ महिला जागा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के महिला आरक्षण आहे. नाशिक महापालिकेत ६७ जागा महिलांच्या ताब्यात जाणार असून, ४३ प्रभागांत प्रत्येकी एक आणि एका प्रभागात दोन याप्रमाणे ४५ महिलांचे आरक्षण असेल, तर उर्वरित २२ जागांच्या आरक्षणाची सोडत चिठ्ठ्या टाकून काढण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर १४ मेस राज्य निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर केली. निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रक्रिया पार पाडून तीन ते चार महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेची मुदत मार्चमध्ये संपली असली, तरी इतर मागासवर्यीग (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्यावरून ती पुढे ढकलली गेली. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेल्यांना धक्का बसला.

सोडतीचे लाइव्ह प्रसारण

नाशिक महानगरपालिके तर्फे अनुसूचित जाती, जमाती महिला व सर्वसाधारण महिलां गटाचे आरक्षण निश्चितीसाठी महापालिकेच्या nmc.gov.in या संकेतस्थळावर, तसेच ‘माय नाशिक फेसबुक’ पेजवर फेसबुक लिंक : https://fb.me/e/6xjFDs7fl यू ट्यूब लिंक : https://youtube.com/c/mynmc सोडतीचे लाइव्ह प्रसारण होणार आहे. सोडतीचे मंगळवारी (ता ३१ ) सकाळी दहाला ऑनलाईन प्रसारण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.