Nashik Municipality News : महापालिकेला शासनाच्या निधीचे वावडे; स्वखर्चातून फाळके स्मारक पुनर्विकासाचे प्रयत्न

Dadasaheb Phalke Smarak - Nashik
Dadasaheb Phalke Smarak - Nashikesakal
Updated on

Nashik Municipality News : अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकासासाठी एकीकडे पालकमंत्री दादा भुसे व माजी पालकमंत्री छगन भुजबळ प्रयत्न करत असताना शासनाकडून प्राप्त होणाया निधीऐवजी महापालिकेला स्वनिधी खर्च करण्यात अधिक रस आहे.(Municipality Efforts to redevelopment of Phalke memorial through self expenditure nashik news)

त्यासाठीच सल्लागार संस्था नियुक्त करण्याची घाई करून स्वनिधी खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात या सल्लागार कंपन्यांच्या प्रारूप प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेकडून १९९९ मध्ये पांडव लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत फाळके स्मारक तयार करण्यात आले होते. सुरवातीला फाळके स्मारक पर्यटनाचे मुख्य केंद्र बनले. मात्र प्रकल्पाच्या एक-एक भागाचे खाजगीकरण करण्यास सुरवात झाल्यानंतर उत्पन्न कमी होऊन खर्च अधिक होऊ लागला.

सध्या फाळके स्मारकाची अवस्था पांढरा हत्ती पोसण्यासारखी झाली आहे. २४ वर्षात प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीवर १२ कोटी रुपये खर्च झाले. परंतु उत्पन्न जेमतेम चार कोटी रुपये प्राप्त झाले. त्यामुळे फाळके स्मारकाची अवस्था बिकट झाली. भाजपच्या सत्ताकाळात स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासाठी खासगी संस्था नियुक्ती करण्यासाठी निविदा काढण्यात आली. एनडी स्टुडिओला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पालकमंत्री पदाची सूत्रे छगन भुजबळ यांच्याकडे आले. एनडी स्टुडिओकडून महापालिकेला वर्षासाठी अवघे १४ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविण्यात आली.

Dadasaheb Phalke Smarak - Nashik
Nashik Municipal News : नाशिक मनपाचे अंदाजपत्रक होणार विलंबाने सादर

मात्र २९ एकर जागेसह मालमत्तेचा वापर चित्रपट निर्मितीसाठी केला जाणार असल्याने हा व्यवहार महापालिकेला परवडण्यासारखा नसल्याचे कारण देत भुजबळ यांनी प्रकल्पावर फुली मारली. पर्यटन खात्याकडे निधीची मागणी करण्याची सूचना केली. त्यानुसार पर्यटन विभागाकडे ४० कोटी निधी महापालिकेने मागितला, मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

सल्लागार कंपन्या नियुक्तीसाठी धडपड

पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील शासनाकडे फाळके स्मारकाच्या पुनर्विकासनासाठी निधीची मागणी विधानसभेच्या चालू अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केली. शासनाकडून स्मारकासाठी निधी मिळवण्यासाठी दोन बलाढ्य मंत्री प्रयत्न करत असताना व शासनदेखील सकारात्मक असताना महापालिकेमार्फत स्वनिधी खर्च करण्याची तयारी सुरू झाली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून सल्लागार कंपन्या नियुक्त करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. सल्लागारांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अल्मंडस् ग्लोबल इन्फ्रा, आमिश अगाशिवाला, ब्रह्मा कन्सल्टन्सी, डिझाईन फोरम कन्सल्टंस‌्, किमया, अर्बन पंडित इन्फ्रा, फोर्थ डायमेन्शन आर्किटेक्ट या कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे.

Dadasaheb Phalke Smarak - Nashik
Nashik Municipal Hospital Bharti: महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मानधनावर डॉक्टरांसह सहाय्यक भरती

सध्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महापालिका हद्दीत आमदार निधीतून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. महापालिकेकडून ना- हरकत दाखला घेऊन कामे केली जात असल्याने जवळपास पाचशे कोटींच्या कामांना महापालिका मुकली आहे. त्यामुळे फाळके स्मारकाचे काम महापालिकेमार्फत होण्यासाठी प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून फाळके स्मारकाचे काम स्वनिधीतून करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.

''फाळके स्मारकाच्या पुनर्विकासासाठी सल्लागार नियुक्तीकरिता सात मक्तेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. पुढील आठवड्यात प्रारूप आराखड्याचे सादरीकरण आयुक्तांसमोर केले जाईल.

त्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेने सल्लागार नियुक्ती अंतिम केली जाईल. तीन महिन्यात संबंधित सल्लागाराकडून स्मारकाच्या पुनर्विकासासाठी सविस्तर अहवाल तयार केला जाईल.''- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.

Dadasaheb Phalke Smarak - Nashik
Nashik Municipal News : जाहिरात शुल्क वाढीचा निर्णय ठराविक ठेकेदारांसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.