NMC News: महापालिकेकडून आणखी ४५१ दिव्यांगांना मासिक तीन हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता शहरात एकूण दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या दोन हजार ५२१ वर पोचली आहे. महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी १२ योजना राबविल्या जातात.(municipality will give Financial assistance of 3000 to persons with disabilities nashik news)
योजनांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. प्रौढ बेरोजगार दिव्यांगांसाठी अर्थसाहाय्य योजना आहे. योजनेंतर्गत ४० वर्षांवरील दिव्यांगांना मासिक दोन हजार रुपये अनुदान होते. परंतु १८ ते ४० वयोगटातील दिव्यांग व्यवसाय, काम करण्यास असमर्थ असल्याने त्यांचाही समावेश योजनेत करण्यात आला आहे.
त्याचबरोबर दिव्यांगांच्या मासिक अर्थसाहाय्य योजना रक्कमेत एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण तीन हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत दोन हजार ७० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आता नव्याने ४५१ दिव्यांगांना अर्थसाहाय्य योजना मंजूर करण्यात आली.
अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत ४२७ प्रकरणात मतिमंद, बहुविकलांग दिव्यांगांना अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत २४ प्रकरणात दरमहा रुपये तीन हजार याप्रमाणे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.
दिव्यांग विद्यार्थ्यांना २० ते ५० हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जात असून, महापालिकेच्या तसेच खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे. योजनेकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असून, मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.