नाशिक : मुलींना मोबाईल का दाखवितो येथून निघून जा, असे म्हटल्याचा राग आल्याने एका तरुणाने एकास चाकू भोसकून ठार केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित गौरव जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा (Murder Case) दाखल करण्यात आला आहे. रमेश ताटे, असे मयत इसमाचे नाव आहे.
बुधवारी (ता.१३) रात्री आठला अजिंक्य जाधव हा उत्कर्षनगर भागात असताना परिसरातील मुलींना मोबाईल (Mobile) दाखवीत असताना रमेश ताटे यांनी अजिंक्य यास मुलींना मोबाईल का दाखवितो, येथून निघून जा असे म्हटले. या गोष्टींचा राग अजिंक्यचा भाऊ गौरव जाधव यास समजले. या गोष्टीचा राग आल्याने त्याने उपस्थित लोकांच्या समोर धारदार चाकूने रमेश ताटे यांच्या हात व छातीवर सपासप वार केले. या झटापटीमध्ये गौरव यादेखील जखमी झाला, तर रमेश ताटे हे ठार झाले. याप्रकरणी मनीष रूपवते यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.