Nashik Crime: अवघ्या काही तासातच खुनाच्या गुन्ह्याची उकल; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

Sagar Shinde
Sagar Shindeesakal
Updated on

पंचवटी : मखमलाबाद रोडवरील जगझाप मळा परिसरात काही मित्रांमध्ये दारूची पार्टी सुरू असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका २८ वर्षीय युवकाची धारधार शास्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली.

पोटात आणि डोक्यात गंभीर जखमा झाल्याने हा युवक जागीच गतप्राण झाला. या हल्ल्यात अन्य एकजण जखमी झाला.

तर घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयित हल्लेखोरांना पंचवटी पोलिसांनी अवघ्या काही तासात मौजे सुकेणे येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Murder Crime Solved Within Hours Performance of Panchavati Crime Investigation Team Nashik Crime)

ऋषिकेश रामचंद्र आहेर, (वय २३ , रा. श्रीकृष्ण नगर मोरे मळा पंचवटी नाशिक),केदार साहेबराव इंगळे (वय २५, रा. कोशिरे मळा हनुमान वाडी पंचवटी नाशिक), नकुल सुरेश चव्हाण, (वय १८ , रा. काकडबाग मोरे मळा पंचवटी नाशिक), दीपक सुखदेव डगळे (वय २३ , रा मोरे मळा रामनगर पंचवटी नाशिक) या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सागर विष्णू शिंदे (वय २८, राहणार, मखमलाबाद नाका, क्रांतीनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी (ता.१३) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास सागर व त्याचे मित्र मखमलाबाद रोडवरील जगझाप मळा परिसरातील प्रणव डिस्ट्रीब्युटर्स बाहेर ओट्यावर दारूची पार्टी करीत बसले होते.

या सुमारास संशयित केदार इंगळे व त्याचे पाच ते सहा साथीदार लाल रंगाची चारचाकी व दुचाकीवरून याठिकाणी आले. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून सागर व त्याचे मित्र यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

यातच एकाने सागर शिंदे याच्यावर धारधार शास्त्राने वार केले. पोटात आणि डोक्यावर खोलवर गंभीर जखमा होऊन सागर रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर अन्य एकजण जखमी झाला. यानंतर हल्लेखोर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

त्यांनी घटनेची माहिती घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय कार्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या काही तासात पळून जात असलेले संशयित केदार इंगळे, ऋषीकेश आहेर, दीपक दांगळे व नकुल चव्हाण या चौघा संशयित हल्लेखोरांना कसबे सुकेणे येथून शिताफीने ताब्यात घेतले.

Sagar Shinde
Dhule Crime News: साळुंखे खून प्रकरणी 5 अटकेत; दिघी, रतलाम येथे पाठलाग करत एलसीबी पथकाकडून शिकंज्यात

याप्रकरणी आकाश मोतीराम गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

काही वर्षांपूर्वी केदार इंगळे च्या भावाचा खून झाला होता, यात सागर शिंदे सामील असल्याबाबत संशयित केदारला संशय होता. तसेच याच्या वडिलांसोबत दोन ते तीन दिवसांपूर्वी सागर यांच्यात भांडण झाले होते.

यावेळी सागर याने संशयिताच्या वडिलांना शिवीगाळ करत कानशिलात भडकावली होती. याचा मनात राग धरून संशयित केदार इंगळे व त्याच्या सहा ते सात साथीदारांनी मिळून सागर याची निर्घृण हत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी किरकोळ वादातून ही घटना घडली आहे. तर सागर शिंदे याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात तीन ते चार गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.

यांनी बजाविली कामगिरी

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, परदेशी, पोलिस नाईक राकेश शिंदे, पोलिस अंमलदार नितीन पवार, गोरक्ष साबळे, घनश्याम महाले आदींनी बजाविली

Sagar Shinde
Crime News: धक्कादायक! घरातील गुप्तधन शोधण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.