नाशिक : डोक्यात दगड घालून शेतमजुराचा खून

सटाण्यातील कंधाणे फाट्यावरील घटना
Murder farm laborer by throwing a stone his head Nashik news
Murder farm laborer by throwing a stone his head Nashik news
Updated on

सटाणा : शहरालगत असलेल्या कंधाणे फाट्यासमोरील शेतात डोक्यात दगड घालून शेतमजुराचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. ३) सकाळी उघडकीस आली. घमजी रंगनाथ माळी (वय ५०, रा. पिंगळवाडे) असे शेतमजुराचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली असून, सटाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोरेनगर (ता. बागलाण) येथील शेतकरी जितेंद्र सोनवणे यांच्या शेतात घमजी माळी काही वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करत होते. शनिवारी (ता. २) सटाणा येथे आठवडेबाजार असल्याने ते बाजार करण्यासाठी घराबाहेर पडले. रात्री उशीर झाला तरी पती घरी न परतल्याने पत्नी चिंतेत होती. त्यांनी पतीची सर्वत्र शोधाशोध केली, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. रविवारी (ता. ३) सकाळी आठला शहरालगत असलेल्या कंधाणे फाट्यासमोरील विलास सोनवणे यांच्या शेताजवळ माळी यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. अतिशय निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून दगडाने त्यांचा चेहरा ठेचण्यात आला आहे. मृतदेहाशेजारीच खुनात वापरलेला मोठा दगड पडला होता. सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बघताच बघ्यांना भीतीमुळे घाम फुटला. त्यांनी तत्काळ सटाणा पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, हवालदार हेमंत कदम, जिभाऊ पवार, अजय महाजन, भास्कर बस्ते, प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या वेळी बघ्यांनी गर्दी केली होती. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. खुनामध्ये कुणाचा हात असावा, त्यामागील उद्देश काय असावा, यासंदर्भात पोलिस निरीक्षक अनमुलवार अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()