Nashik : सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा खुन

murder of security personnel latest crime news
murder of security personnel latest crime news esakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : नांदुरी - सप्तशृंगी गड घाट रस्त्यावरील गणेश घाटाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तिने सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा मानेवर व चेऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खुन (Murder) केल्याची घटना घडली असून मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन कळवण पोलिसांत अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (murder of security personnel of Saptashrungi Nivasini Devi Trust Nashik latest crime news)

murder of security personnel latest crime news
PM पीक विमा योजना : शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत

नांदुरी ते सप्तशृंग गड या दहा किलोमीटर अंतराच्या वळणावरील भागातील गणेश घाटाच्या धबधब्याजवळ एक युवक जखमी असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी सप्तश्रृंग गडावरील न्यासाच्या कार्यालयात ही माहिती दिली. घटनास्थळावर न्यासाची रुग्णवाहिका पाठविली.

तेथे पोहोचताच कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता यात काहीतरी घातपात झाल्याचा संशय आल्याने वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना ही माहिती देण्यात आली. मृतदेहाची अवस्था पाहताच हा खून असल्याचे प्रथमदर्शनी तपासात निदर्शनास येवून खून झालेली व्यक्ती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचा सुरक्षारक्षक अर्जुन अंबादास पवार, वय ३० रा. सप्तश्रृंग गड हल्ली मुक्काम भेंडी, ता. कळवण असल्याचे समजले.

murder of security personnel latest crime news
अज्ञात माथेफिरूने चक्क शेतातील कपाशी उपटून फेकली!; कठोर कारवाईची मागणी

दरम्यान याबाबत मयताची पत्नी आशा अर्जुन पवार, वय २५ हीने दिलेल्या फिर्यादीनूसार भेंडी येथून १२ जुन रोजी सांयकाळी ७ वाजेच्या दरम्यान पती अर्जुन पवार हे नेहमीप्रमाणे सप्तशृंगी गडावर नाईट ड्युटीसाठी जात असतांना रात्री साडे आठ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान सप्तशृंगी घाट रस्त्यावर अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता मानेवर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खुन केला असल्याची फिर्याद दिली आहे.

दरम्यान घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांनी भेट देवून पाहाणी केली असून कळवणचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.