Nashik Crime News: खडकजांब येथील तरुणाचा पालखेड धरणालगत खुन

Murder of youth from Khadakjamb near Palkhed Dam nashik crime news
Murder of youth from Khadakjamb near Palkhed Dam nashik crime news
Updated on

Nashik Crime News: लोखंडेवाडी, (ता. दिंडोरी) शिवारातील पालखेड धरणाच्या भरावाच्या किनारी खडकजांब, (ता. चांदवड) येथील युवकाचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार तीक्ष्ण हत्याराने तोंडावर व अन्य भागावर वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत वणी पोलिसांत रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Murder of youth from Khadakjamb near Palkhed Dam nashik crime news)

वणी पोलिस स्टेशन हद्दीतील लोखंडेवाडी शिवारात असलेल्या पालखेड धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर व धरणाच्या भरावाच्या दगडांवर ता. २१ रोजी दुपारी ३ ते ता. २२ रोजीचे दुपारी २ वाजेच्या दरम्यान किशोर दगु उशीर (वय 26 वर्षे, राहणार खडकजांब ता. चांदवड) यावर अज्ञात आरोपीने कोणत्यातरी धारदार हत्याराने कपाळावर खोलवर वार केले.

तसेच तोंडाला, जबड्याला, दोन्ही डोळ्यांना, चेहऱ्यावर, गालावर, डोक्यावर गंभीर वार करून त्याचा खुन केला.

Murder of youth from Khadakjamb near Palkhed Dam nashik crime news
Nashik Crime News: फटाके फोडण्याच्या वादातून मित्रांनीच केला युवकाचा खून

मयताचा मृतदेह लोखंडेवाडी शिवार पालखेड धरणाच्या भरावाच्या आत ओढत नेवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत सुरेश सुधाकर कांडेकर, वय 39 रा. खडकजांब (मयताचे नातेेेेेवाईक) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मयतास ग्रामिण रुग्णालयात रात्री शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. मात्र नातेवाईकांच्या मागणीनूसार मृतदेह नाशिक येथे फॉरेन्सिक ओपिनियन साठी पाठविण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे, पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे अधिक तपास करीत आहे.

Murder of youth from Khadakjamb near Palkhed Dam nashik crime news
Nashik Crime News: बाळाला बाहेर नेल्यासंदर्भात विचारणा केल्याने पतीने पत्नीला केले ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.