Folk Artist : संगीत शिक्षणाचा गंध नव्हता, पण गायी चारताना बासरीतून गवसलेल्या सुरामुळे सावरपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे कलावंत घडले.
इथल्या सनई-संबळ वाद्याला जिल्हाभरातून मागणी असते. शेतातील कामे झाली, की कलावंत पाड्यावरील मंदिरात एकत्र येतात. आता त्यांचा समूह तयार झाला आहे. त्यांचे सनई-संबळ लग्नसराईत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेले असते. (musical instrument from playing flute to cows grazing huge demand for sanai sambal from all over district Nashik)
रामदास राऊत, गणपत राऊत, गोविंद राऊत, गोपाल बोरसे हे संबळ वाजवतात. लवसू राऊत हे काडीचे गाणे सादर करतात. धर्मा राऊत ढोलकीवादन करतात. हे सर्व कलावंत साठी पार केलेले आहेत.
लहानपणी जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्यावर बांबूपासून बासरी बनवत विविध गाणी वाजवत असत. त्यातून आवड वाढून त्यांना सूर सापडले आहेत. बोहाडामध्ये हे कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करतात.
देवधर्म, गवळण, चित्रपट गीते सादर करतात. दिवसभर न थकता त्यांचे वादन चालते. मुंबईतील कार्यक्रमांसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कलेचे कौतुक केले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
डीजेच्या दणदणाटातसुद्धा सनई-संबळचे आदिवासी पाड्यावरील कलावंतांनी आपले स्थान अबाधित राखले आहे. वाढत्या वयामुळे सरकारने मानधनासाठी आमचा विचार करावा, अशी त्या कलावंतांची मागणी आहे.
"लहानपणापासून आम्ही विविध वाद्य वाजवतो. कोणतेही मार्गदर्शन त्यासाठी आम्हाला मिळालेले नाही. तरुणाईने या कलेत पारंगत व्हावे म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत."
- रामदास राऊत (कलावंत)
"जंगलात गायी चारताना आम्ही संगीत शिकलो. हजारो गाणी आम्ही वाजवतो. लग्न सोहळा, दशक्रिया विधीला आम्ही कार्यक्रम सादर करतो. कलावंत मानधन योजनेचा आम्हाला लाभ मिळावा, अशी अपेक्षा आहे." - गणपत राऊत (कलावंत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.