musical Padwa pahat at Rushiraj Harmony nashik news
musical Padwa pahat at Rushiraj Harmony nashik news

Diwali Padwa Pahat: ऋषिराज हार्मनी येथे संगीतमय पाडवा पहाट थाटात संपन्न

Published on

Diwali Padwa Pahat : नाशिकचे सुप्रसिध्द गायक मकरंद हिंगणे, हर्षद वझे आणि केतन ईमानदार आणि सुप्रसिद्ध तबला वादक नितीन पवार आणि सहकारी यांनी मराठी व हिंदी भक्तीगीत सादर करीत एक संगीतमय पाडवा पहाट उत्साहात पार पडली. (musical Padwa pahat at Rushiraj Harmony nashik news)

ओंकार स्वरुपा, एक राधा - एक मीरा, माझे माहेर पंढरी, राम का गुणगान करिये इत्यादी भजन गात ऋषिराज हार्मनीने उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत एक स्मरणीय पहाट झाली.

ऋषिराज हार्मनीत प्रथमच पाडवा पहाट करण्याची संकल्पना सीए प्रफुल बरडिया यांनी मांडत संयोजन केले आणि संजय पाटील, नितीन शिरभाते, ॲड अजय मिसर, श्री नितीन मुलतानी, श्री आयरेकर, श्री कोटवाले, श्री वाढीवकर, श्री प्रशांत जयस्वाल, श्री शेंडगे, श्री पोरिया, श्री अशोक झोपे, आणि श्री मूछाल इत्यादींच्या सहकार्याने आयोजित सूरमयी पाडवा पहाट झाली.

musical Padwa pahat at Rushiraj Harmony nashik news
Diwali Pahat 2023 : देशाच्या मातीलाही शिवरायांशिवाय पर्याय नाही; आमदार हरिभाऊ बागडे

यावेळी डॉ टिळक, सीए रत्नपारखी, शरद गोरडे, श्री नंदवाणी, सौ अनुश्री आशिष कोटवाले, सौ इनामदार, श्री सावंत इत्यादी उपस्थीत होते. मकरंद हींगणे आदी कलाकारांचा यथोचित सत्कार ऋषिराज हार्मनी च्या ज्येष्ठ सदस्यांनी करत त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे संचालन श्री प्रफुल बरडिया आणि श्री नितीन शिरभाते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ दमयंती बरडीया, सौ मीनल जयस्वाल, श्री आशिष कोतवाले इत्यादींनी परिश्रम घेतले.

musical Padwa pahat at Rushiraj Harmony nashik news
Padwa Pahat: आर्याच्या स्वरांनी नाशिककर मंत्रमुग्ध! पाडवा पहाट कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरवासीयांना सांगीतिक पर्वणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()