‘त्याने' कुटुंबीयांना घडविले पालखीचे लाइव्ह दर्शन

mute & deaf Student making video calll to family
mute & deaf Student making video calll to familyesakal
Updated on

नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिक शहरात मंगळवारी (ता. १४) अशोकस्‍तंभ येथे आगमन झाले असता, मूकबधिर विद्यार्थ्यांने (mute & deaf student) आपल्‍या कुटुंबीयांना पालखी सोहळ्याचे (Palakhi Ceremony) लाइव्ह दर्शन व्हिडिओ कॉलवरून (Video Call) घडविले. पूर्वी दूरध्वनीचा संवाद साधण्यासाठी (Calling) उपयोग होत होता. दोन व्यक्तींमधील श्राव्य संवाद हा दूरध्वनीचा मुळ उद्देश होता. (mute deaf student video call family to show sant nivruttinath maharaj palkhi ceremony Nashik News)

mute & deaf Student making video calll to family
मॉन्सून लांबल्यास पाणी कपातीचे संकट ओढविणार

हल्‍ली प्रगत तंत्रज्ञानामुळे दृकश्राव्य माध्यमामुळे व्हिडिओ कॉलने आपण एकमेकांना समोरासमोर पाहू शकतो. याचाच प्रत्‍यय संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे नाशिक शहरात अशोकस्‍तंभ येथे आगमन झाले असता आला. मूकबधिर विद्यार्थ्यांने आपल्‍या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल करून लाइव्‍ह दर्शन घडवून आणले, तसेच तो हातवारे करून त्‍यांच्‍याशी अतिशय कुतूहलाने संवाद साधत होता. तो क्षण अतिशय भावनिक असा होता. पंधरा ते तीस मिनिटांच्या कॉलमध्ये त्‍याने आपल्‍या कुटुंबीयांना दिंडीतील ताल धरलेले वारकरी, वारकऱ्यांच्‍या लांबच लांब असलेल्‍या रांगा, पालखी अशा साऱ्या सोहळ्याचे दर्शन घडविले. व्हिडिओ कॉलमुळे भावनिक संवाद साधणेही शक्‍य झाले आहे. त्‍याच्या चेहऱ्यावर असलेले कुतूहल आणि आनंद तसेच कुटुंबीयांनाही घरी असताना दर्शनाचा लाभ झाला. यामुळे झालेला आनंद बघण्यासारखा होता.

mute & deaf Student making video calll to family
रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या व्यवसायांवर पोलिसांकडून बडगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.