Nashik Crime News : 330 क्विंटल साखरेची परस्पर विक्री; फसवणुकीचा गुन्हा दाखल

fraud crime
fraud crimeesakal
Updated on

नाशिक : परजिल्ह्यातील साखर कारखान्यातील ३३० क्विंटल साखर गुदामात उतरवून त्याची परस्पर विक्री करीत व्यापाऱ्यास साडेअकरा लाखांना गंड घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात संशयित व्यापारी रोशन लक्ष्मण भोजवानी (रा. सुभाष रोड, नाशिक रोड) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mutual sale of 330 quintals of sugar Fraud case registered Nashik Latest Crime News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

fraud crime
Nashik News : नाशिकचा विभव ठरला पोडियम पूर्ण करणारा पहिला सायकलिस्ट

लेहरचंद रतीलाल लोढ्या (रा. बळी मंदिराजवळ, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, २२ मे ते २३ जुलै या दरम्यान सदर प्रकार घडला आहे. लोढ्या यांची दीप ट्रेडर्स नावाची फर्म आहे. तर संशयित भोजवानी यांची दिपेश ट्रेडिंग कंपनी असून, दोघेही साखरेचे व्यापारी आहेत. संशयित भोजवानी यांनी व्यवहार करून संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, प्रवरा सहकारी साखर कारखाना येथून लेहरचंद यांच्या नावाच्या बिलावर ११ लाख ४३ हजार रुपयांची ३३० क्विंटल साखर स्वत:च्या गुदामात उतरवली.

दरम्यान, लेहरचंद यांनी या साखरेचे बिल भोजवानी यांना दिले नव्हते. त्याचा गैरफायदा भोजवानी यांनी घेतला व साखरेची परस्पर विक्री केल्याचा आरोप लेहरचंद यांनी केला आहे. त्यानंतर लेहरचंद यांनी भोजवानी यांच्याकडे साखरेच्या बिलाचे पैसे मागितले असता भोजवानी यांनी माझ्या नादाला लागू नको, अशी दमदाटी करीत पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे लोढ्या यांनी आडगाव पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud crime
Dhule Plastic Ban : 4 टन ‘रिसायकलिंग’ला; साडेतीन टन पुन्हा जमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.