Nashik Crime: बनावट दस्तावेज करून बंगल्याची परस्पर विक्री; तिघांना अटक, शासनाची लाखोंची फसवणूक

Money Crime
Money Crimeesakal
Updated on

Nashik Crime : आडगाव शिवारात असलेल्या बांधिव बंगल्याचे बनावट दस्ताऐवज व कागदपत्रे तयार करून संशयितांनी परस्पर विक्री केल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून, याप्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे.

अटक केेलेल्या संशयितांना एक शहरातील नामांकित बँकेचा मॅनेजर आहे. दरम्यान, सदरील गुन्ह्यात महसुल विभागाच्या अधिकार्यांचाही समावेश असण्याची दाट शक्यता असून, यामुळे शासनाची लाखोंची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. (Mutual sale of bungalow with forged documents Three arrested defrauding government of lakhs Nashik Crime)

सतिश सुभाष पुरोहित, महेंद्र विनायक पानकर, प्रशांत बडगुजर यांना आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित नवनाथ साहेबराव नजन याचा पोलीस शोध घेत आहेत.

विशाल सोमनाथ गाढवे (हल्ली रा. गोविंदनगर, कोपरगाव, जि. अहमदनगर. मूळ रा. दत्तनगर, चुंचाळे शिवार, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, मौजे आडगाव शिवारात गट नं. ३७०/३, प्लॉट नं. ३, क्षेत्र १५३.१९ चौ.मी. हा बांधिव बंगला गाढवे यांच्या वडिलांच्या नावे आहे.

त्यांनी तो २०१५ मध्ये राजाराम कडूशेठ पोतदार यांच्याकडून खरेदीखताद्वारे विकत घेतला होता. दरम्यान, २०१७ मध्ये सोमनाथ गाढवे यांचे निधन झाले. मात्र, माहिती नसल्याने विशाल गाढवे यांनी मिळकतीवर वारसदार म्हणून नाव लावले नव्हते.

वडलांच्या निधनानंतर ते त्याच बंगल्यात राहत होते. तर, जानेवारी  २०२० मध्ये गांजा बाळगल्याप्रकरणी विशाल गाढवे यास अटक केल्याने तो दोन महिने कारागृहात होता.

कारागृहातून बाहेर आला असता, बंगल्यात अनोळखी व्यक्ती राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यास बंगल्याची परस्पर विक्री झाल्याचे समोर आले.

Money Crime
Nashik Fraud Crime: विवाहयोग्य मुलगी शोधू देण्याच्या आमिषाने सव्वा लाखांत फसवणूक

विशाल याने आडगाव तलाठी कार्यालयात नोंदी तपासल्या असता, बनावट कागदपत्रे, पॅनकार्ड व आधारकार्डच्या आधारे सदरील बंगल्याची एकदा नव्हे तर तीनवेळा विक्री करण्यात आल्याचे आढळून आले.

याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने तपास करीत मुख्य संशयित प्रशांत श्रीराम बडगुजर, शहरातील एका नामांकित बँकेचा व्यवस्थापक सतिश सुभाष पुरोहित आणि महेंद्र विनायक पानकर यांना अटक केली आहे. संशयितांच्या अटकेतून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

शासकीय  अधिकारी संशयाच्या घेऱ्यात

जमिनी, प्लॉट, फ्लॅटचे बनावट दस्तऐवज करीत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. असे असताना यात महसुल विभागाच्या अधिकार्याचा संगनमताशिवाय फसवणूक होऊ शकत नाही. यामुळे शासनाची लाखोंची फसवणूक केली जाते.

या प्रकरणातही राजाराम पोतदार यांच्याऐवजी बनावट पोतदार उभे करून दोन व्यवहार करण्यात आल्यानंतरही संबंधित महसुल अधिकार्याच्या लक्षात फसवणूक लक्षात कशी आली नाही, याबाबत शंका उपस्थित होते आहे.

Money Crime
Kolhapur Crime : बायको माहेरी गेल्याच्या निराशेतून नवऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; गणपती विसर्जन मिरवणूक संपवून घरी आला अन्..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.