नाशिक : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदानानंतर सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रक्रियेला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात पदाधिकारी व तालुका निहाय मतपत्रिकांचे विभागणी करण्यात येत आहे.
दुपारी साडेबारापर्यंत मतपत्रिका विभागणीची प्रक्रिया सुरू राहिली. अशात अवघ्या काही तासात निकाल जाहीर होणार असल्याने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे. (MVP Election 2022 Counting of votes started nashik latest marathi news)
निवडणूक मंडळातर्फे 25 टेबल मांडलेले असून सायंकाळी सात पर्यंत अंतिम निकाल घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे . मविप्र संस्थेच्या निवडणुकीत श्रीमती नीलिमाताई पवार यांचे प्रगती पॅनल आणि ऍड. नितीन ठाकरे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत होते आहे.
उत्सुकतेपोटी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी मतमोजणी केंद्र बाहेर होऊ लागली असून गुलाल उधळण्यासाठी दोन्ही पॅनलचे समर्थकांमध्ये उत्साह बघायला मिळतो आहे. निकाल जाहीर होण्यास सायंकाळी उशीर होणार असला तरी साधारणतः पाचपर्यंत निकालाचा कल समजू शकणार आहे.
पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्यात आली आहे. प्रगती व परिवर्तन पॅनल यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. नीलिमा पवार पहिल्या फेरीअखेर 502 मते मिळाली आहेत तर परिवर्तन पणालचे नितीन ठाकरे यांना 487 मते मिळाली आहेत.
पहिल्या फेरीनंतर मतदान
अध्यक्ष
डॉ. सुनील उत्तमराव ढिकले (प्रगती) : ५९६ (आघाडी)
आ. माणिक शिवाजीराव कोकाटे (परिवर्तन) :३९२
उपाध्यक्ष
दिलीप तुकाराम मोरे (प्रगती) : ५६४ (आघाडी)
विश्वास बापूराव मोरे (परिवर्तन) : ४१७
सभापती
माणिकराव माधवराव बोरस्ते (प्रगती) : ४७६
बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर (प्रगती) : ५०९ (आघाडी)
उपसभापती
डॉ. विलास केदा बच्छाव (प्रगती) : ५१८ (आघाडी)
देवराम बाबुराव मोगल (परिवर्तन) : ४४२
सरचिटणीस
श्रीमती नीलिमा वसंत पवार (प्रगती) :१२०८ (आघाडी)
नितीन बाबुराव ठाकरे (परिवर्तन) : ७८०
चिटणीस
डॉ. प्रशांत पाटील (प्रगती) : ५२७ (आघाडी)
दिलीप सखाराम दळवी (परिवर्तन) : ४७६
नाशिक ग्रामीण
सचिन पंडित पिंगळे (प्रगती) : 510 (आघाडी)
रमेश पिंगळे (परिवर्तन) : 482
येवला
माणिकराव शिंदे (प्रगती) : ४५८
नंदकुमार बनकर (परिवर्तन) : ५२६ (आघाडी)
सिन्नर
हेमंत वाजे (प्रगती) : 415
कृष्णा भगत (परिवर्तन) : 563
मालेगाव
डॉ. जयंत पवार (प्रगती) : ५१४ (आघाडी)
रमेश बच्छाव (परिवर्तन) : ४७१
देवळा
केदा तानाजी आहेर (प्रगती) : ४९२
विजय पगार (परिवर्तन) : ४९४ (आघाडी)
चांदवड
उत्तम भालेराव (प्रगती) : ४७४
डॉ. सयाजी गायकवाड (परिवर्तन) : ५१२
नांदगाव
चेतन पाटील (प्रगती) : ४९५ (आघाडी)
अमित पाटील (परिवर्तन) : ४९२
सटाणा
विशाल सोनावणे (प्रगती) : ४९१
प्रसाद सोनवणे (परिवर्तन) : ४९१
नाशिक शहर
नानासाहेब महाले (प्रगती) : ४९६ (आघाडी)
लक्ष्मण लांडगे (परिवर्तन) : ४८८
इगतपुरी
भाऊसाहेब खातळे (प्रगती) : ४८६ (आघाडी)
संदीप गुळवे (परिवर्तन) : ४८२
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.