MVP Election : 6 उमेदवारी अर्ज बाद; 4 उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर

MVP election Latest Marathi News
MVP election Latest Marathi Newsesakal
Updated on

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीअंतर्गत शुक्रवारी (ता.१२) दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. प्राप्त ४१० अर्जांपैकी सहा अर्ज नामंजूर केले आहे. बाद अर्जांपैकी नानाजी दळवी व दिलीप दळवी यांनी अन्‍य कार्यकारिणी पदांसाठी अर्ज केलेले असल्‍याने ते निवडणूक रिंगणात कायम राहतील. उर्वरित चार उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडले आहेत. (MVP Election 6 candidature applications rejected 4 candidates out of election nashik Latest Marathi News)

निवडणुकीसाठी दाखल झालेल्‍या पदाधिकारी, तालुका सदस्‍य, सेवक सदस्‍य यांच्‍या उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक कार्यालयात पार पडली. सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत ही प्रक्रिया पार पडली.

त्‍यानुसार सहा अर्ज बाद ठरले आहेत. २०१२ ते २०१७ या काळात उपसभापतिपद भूषविलेल्या नानाजी दळवी यांचा सटाणा तालुका सदस्‍यपदाचा अर्ज बाद झालेला आहे. अनुमोदक हे दोन उमेदवारांना अनुमोदक असल्‍यामुळे हा अर्ज नामंजूर केला आहे. दरम्‍यान श्री.दळवी यांचे उपाध्यक्ष, उपसभापती आणि चिटणीस या पदांसाठी असे तीन अर्ज दाखल असल्‍याने ते निवडणूक रिंगणात कायम आहेत.

महिला सदस्‍यपदासाठी अर्ज केलेल्‍या उषा भामरे यांचा अर्ज नामंजूर केला आहे. त्‍यांनी अर्जासोबत शंभरच्‍या स्‍टँपपेपरवर परिशिष्ट-ब चे नमुन्‍यात प्रतिज्ञापत्र जोडलेले नसल्‍याने अर्ज नामंजूर केला.

गत निवडणुकीत समाज परिवर्तन पॅनलकडून उमेदवारी केलेल्‍या दिलीप दळवी यांचा सटाणा तालुका सदस्‍य पदाचा अर्ज नामंजूर झालेला आहे. अनुमोदक हे दोन उमेदवारांना अनुमोदक असल्‍याने हे अर्ज नामंजूर झाले. दरम्यान त्‍यांचेही उपाध्यक्ष, उपसभापती आणि चिटणीस पदासाठी अर्ज दाखल असल्‍याने तेही निवडणूक रिंगणात कायम आहेत.

MVP election Latest Marathi News
Sakal Exclusive : 11 झोपडपट्ट्या सर्वाधिक धोकादायक

निवृत्ती घुमरे यांचा दिंडोरी-पेठ सदस्‍यत्‍वाकरीता अर्ज नामंजूर झाला असून, सूचक हे सिन्नर तालुक्‍यातील व अनुमोदक हे नाशिक तालुक्‍यातील असल्‍याने अर्ज अपात्र ठरला आहे. प्राथमिक व माध्यमिक सेवक सदस्यांसाठी दाखल अर्जात बाळासाहेब निफाडे यांचा अर्ज नामंजूर झाला आहे. मतदारयादीत मतदारांचे नाव बाळासाहेब नाठे व उमेदवारी अर्जात नाठे ऐवजी निफाडे असे असल्‍याने अर्ज नामंजूर केला आहे.

हरकतींसाठी उद्यापर्यंत मुदत

नामंजूर केलेल्‍या अर्जासंदर्भात लवादाकडे अपील दाखल करण्यासाठी उद्या (ता.१३) आणि रविवारी (ता.१४) अशी दोन दिवस मुदत असेल. प्राप्त हरकतींवर लवादाच्‍या वतीने मंगळवारी (ता.१६) दुपारी तीनपर्यंत निर्णय दिला जाईल. यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांचे आज प्रशिक्षण

निवडणूक प्रक्रियेत मतदान व मतमोजणी प्रक्रियेकरीता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले असून, उद्या (ता.१३) पासून या प्रशिक्षणाला सुरवात होणार आहे. संपूर्ण प्रक्रियेची माहिती उपस्‍थित सेवकांना दिली जाणार आहे.

MVP election Latest Marathi News
नाशिक : सिडकोत वृक्ष कोसळला; थोडक्यात वाचली स्कुल व्हॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.