नाशिकमधील ‘त्या’ भुयारी मार्गाचे गूढ कायम; पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची गरज

subway nashik
subway nashikesakal
Updated on

नाशिक : देशपांडे गल्ली येथील दीक्षित वाड्यात बुधवारी (ता.१२) खोदकाम सुरू असताना पुरातन भुयारी मार्ग (subway found in nashik) आढळला होता. गुरुवारी (ता.१३) कामगारांनी भुयारी मार्गाचा रस्ता स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. मार्गात मोठ्या प्रमाणावर माती असून मार्ग मातीने दबलेला असल्याने कामात अडचण येत होती. त्यामुळे भुयारी मार्गाचे गूढ (mystery) अद्याप कायम आहे. (mysterious subway found in nashik marathi news)

subway nashik
महापालिका मुख्यालयात ओल्या पार्ट्यांचा धडाका! CCTV मुळे झाला खुलासा

मार्ग नक्की कुठे जातो?"

तीन प्रवेशद्वार असलेला मार्ग नक्की कुठे जातो, त्याची माहिती नसली तरी रामकुंडपर्यंत मार्ग असल्याचे चर्चा परिसरात होती. गुरुवारी महापालिका प्रशासन पुरातत्त्व विभाग, तसेच पोलिसांकडून दखल घेत त्या मार्गाची पाहणी करण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु प्रत्यक्षात तिन्ही विभागातील कुठल्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली नाही. बहुधा त्यांना त्याचे गांभीर्य नसेल किंवा रमजान ईदची सुट्टी असल्याने याठिकाणी भेट दिली नसावी. अशी चर्चा होती. कामगारांनी मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा खोदकाम सुरू केले आणि मार्गाची खोली तपासण्याचा प्रयत्न केला. मार्गात मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा असल्याने मार्ग पूर्णतः: बंद आहे. त्याचा उपसा करणे शक्य नाही. त्यामुळे भुयारी मार्ग इतिहास उलगडण्यास कामगारांना अपयश येत आहे. सध्या तरी मार्गाचे गुढ कायम आहे. महापालिका प्रशासन किंवा पुरातत्त्व विभागाने यात लक्ष घातल्यास भुयारी मार्गाचे गुढ उकळण्यास मदत होईल.

subway nashik
आता कोण कोणाचे दुःख काढणार? कोरोनामुळे विदारक परिस्थीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.