Nashik Crime News : गोळीबार प्रकरणाचे गुढ कायम; सहायक आयुक्त करणार स्वतंत्र चौकशी

सिडकोतील पवननगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, इंदिरानगरमध्ये गोळीबार झाला.
mystery of firing case remains in indiranagar nashik crime news
mystery of firing case remains in indiranagar nashik crime news
Updated on

Nashik Crime News : सिडकोतील पवननगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, इंदिरानगरमध्ये गोळीबार झाला. मात्र त्याची वाच्यता आठ दिवसांनी झाल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

विशेषत: पोलीस कर्मचाऱ्यानेच हा गोळीबार केल्याची चर्चा आहे. परंतु अद्यापही पोलीसांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नसून, सहायक पोलीस आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी लावली आहे. (mystery of firing case remains in indiranagar nashik crime news)

या चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्तांना दिला जाणार आहे. परंतु पोलीसाने सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याची चर्चा असल्याने शहरासाठी ही बाब चिंताजनक असल्याचे बोलले जाते.

गेल्या आठवड्यात १३ तारखेला मध्यरात्री सिडकोतील पवननगर परिसरात सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला होता. पोलिसांनी याही प्रकरणात चर्चेनंतरच गुन्हा नोंद केला होता. तर, इंदिरानगरच्या वडाळागाव भागात गेल्या १५ तारखेला रात्री गोळीबार झाल्याची चर्चा शुक्रवारी (ता.२२) इंदिरानगर परिसरात पोहोचली.

या चर्चेनुसार, शहर गुन्हेशाखेच्या एका पथकातील पोलीस कर्मचाऱ्यानेच इंदिरानगर भागातील एका एमडी ड्रग्ज पेडलरला धमकावण्यासाठी गोळीबार केल्याची चर्चा आहे. त्यांच्यात पुन्हा शुक्रवारी (ता.२२) वाद झाल्याने त्यातीलच एकाने पोलिसांकडे संपर्क साधून गोळीबार केल्याची माहिती दिल्याचे बोलले जाते.

mystery of firing case remains in indiranagar nashik crime news
Nashik Crime: वडाळा भागातील गोळीबारात पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश?

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही तक्रार देण्यासाठी वा गोळीबार झाल्याचे ठोस माहिती देणारे समोर आलेले नाहीत. त्यामुळे या घटनेची केवळ गोपनीय माहिती पोलीसांसमोर आली आहे. त्यानुसार आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे.

नेमका गोळीबार कोणी केला?

शहर गुन्हेशाखेच्या एका पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने वडाळागावात एकाला धमकावण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. सदरचा कर्मचाऱ्यानेवर यापूर्वीही महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या चर्चेतून पोलीस - गुन्हेगारांचे संबंध पुन्हा समोर आले आहेत. असे असले तरी गोळीबार कोणी केला हे मात्र अद्यापही समोर आले नसून गुढ कायम आहे.

"गोळीबार झाल्याची फक्त चर्चा आहे. त्याबाबत कोणीही समोर आलेले नाही. गोळीबाराबाबत चौकशीत तथ्य आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. " - शेखर देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विभाग -३

mystery of firing case remains in indiranagar nashik crime news
Nashik Crime News: शहरात आठवड्याभरात साडेनऊ लाखांच्या ऐवजावर डल्ला; घरफोड्या, जबरी चोऱ्यांच्या घटनेत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()