Nashik : पोलिस निरीक्षक कदमांच्या आत्महत्त्येचे गूढ कायम

Police Inspector Pravin Kadam
Police Inspector Pravin Kadamesakal
Updated on

नाशिक : मूळचे नाशिकचे रहिवाशी व धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षक असलेले प्रवीण विश्‍वनाथ कदम (५२, रा. पाथर्डी फाटा, इंदिरानगर, नाशिक) यांच्यावर सिडकोतील मोरवाडी अमरधाममध्ये बुधवारी (ता. १६) अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री. कदम यांनी मंगळवारी (ता. १५) धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्त्या केली होती. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्या अपघाती गुन्ह्याच्या तपासाचा उल्लेख केला आहे, त्याचा तपास पूर्ण व योग्यरितीने झाल्याची बाब समोर आल्याने कदम यांच्या आत्महत्त्येचे गूढ वाढले आहे. (mystery of police inspector Pravin Kadam suicide remains Nashik Latest Marathi News)

Police Inspector Pravin Kadam
Nashik : हिंगलाजनगर भागात दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या तपासाचे आव्हान!

प्रवीण कदम हे २००५ मध्ये खात्यांतर्गंत पोलिस उपनिरीक्षक झाले होते. यादरम्यान त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील गंगापूर, सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत होते. २०१३ मध्ये ते गंगापूर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. याच दरम्यान त्यांनी दोन अपघाती गुन्ह्यांचा तपास केला होता. २०१९ पासून ते धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात होते. मंगळवारी (ता. १५) त्यांनी त्याच ठिकाणी राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्त्या केली. त्यांच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी, गंगापूर पोलिस ठाण्यातील फेटलचा तपास योग्यरितीने केला नाही असा उल्लेख असून, आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.

यावरून धुळ्याच्या पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार गंगापूर पोलिस ठाण्यातील त्या अपघाती गुन्ह्यांची माहिती घेण्याच्य सूचना केल्या. मात्र त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण व योग्यरितीने झाल्याचे आढळून आलेले आहे. त्यात कोणतीही कसूर आढळून आलेली नाही. कदम यांची कोणतीही खात्यांतर्गत चौकशीही सुरू नाही. त्यामुळे कदम यांनी आत्महत्त्या का केली याचे गूढ अधिक वाढले आहे. दरम्यान, कदम यांच्यावर आज सिडकोतील मोरवाडी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह, नातलग उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Police Inspector Pravin Kadam
Nashik: पाथर्डीत रंगली वाघ्या- मुरळी पार्ट्यांची जुगलबंदी अन् ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ गजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.