नाशिक : महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीतर्फे एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र विभागात महापालिकेच्या पेठ रोडवरील मायको हॉस्पिटलचा समावेश केला आहे. नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरी प्रमाणपत्र मिळवणारे महापालिका जिल्ह्यातील पहिले केंद्र ठरले आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून दहा एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (इंटिग्रेटेड काउन्सिलिंग ॲन्ड टेस्टिंग सेंटर) विभागांची निवड झाली आहे. एनएबीएल असिस्टंटसाठी (नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबरोटरीज) ही निवड करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातून महापालिकेच्या मायको हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला आहे. (NABL certificate to MICO Hospital first in district Nashik Latest Marathi News)
या प्रक्रियेसाठी हॉस्पिटलमधील समुपदेशक अश्विनी भोसले आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमांगिनी जोशी यांची निवड झाली होती. त्यात ९६ टक्के गुण मिळवून मायको हॉस्पिटलच्या आयसीटीसी विभागाची निवड झाली आहे. निवडलेल्या दहा आयसीटीसीपैकी सर्वांत जास्त गुण नाशिक मायको हॉस्पिटलच्या आयसीटीसीला मिळाले आहेत.
महापालिकेच्या हॉस्पिटलने उत्कृष्ट कामगिरी केल्याने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मायको हॉस्पिटलच्या टीमचे अभिनंदन केले. आयसीटीसी विभागाच्या शहरप्रमुख डॉ. कल्पना कुटे, मायको रुग्णालयप्रमुख डॉ. रुचिता पावसकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी, जिल्हा पर्यवेक्षक सुनीता बोरसे यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.