चांदोरी (जि. नाशिक) : मराठी महिन्यातील श्रावण मास नैसर्गिक दृष्ट्या अतिशय आल्हाददायक असतोधरित्री हिरवा शालू नेसून वाऱ्यावर डोलत असते. हाच धागा पकडून पूर्वजांनी याच महिन्यात सर्वाधिक सणउत्सवाचे नियोजन केले आहे.
श्रावणातील पहिला सण हा नागपंचमीचा येतो. नागपंचमीला वारूळाची पूजा केली जाते. त्याच बरोबर चांदोरी ता निफाड या ठिकाणी गवळी मिरवणूकीचा कार्यक्रम २ ऑगस्ट मंगळवार रोजी संध्याकाळी संपन्न, आला. (Nag Panchami 2022 cultural rituals of Gawli miravnuk at Chandori nashik Latest Marathi News)
लोकवर्गणी जमा करत गवळी मिरवणूक काढली गेली.यात माजी सरपंच देवराम निकम हे गवळी गवळणी,तंटामुक्ती चे अध्यक्ष बबनदादा टर्ले हे पेंद्या,सागर गडाख पोलीस तर सोमनाथ कोटमे हे हवालदाराच्या भूमिकेत होते.
संबळ वाद्यावर सवाद्य गावातून मिरवणूक काढून नदीकाठी असलेला नागोबाचा पार याठिकाणी दुग्धाभिषेख केला गेला.या माध्यमातून हा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत केला जात आहे.
चांदोरी येथील बोहडा महोत्सव प्रमाणे गवळी मिरवणूक ही प्रसिद्ध आहे.कोणत्याही प्रकारच्या गालबोटी शिवाय मिरवणूक पार पाडली जात असते.या प्रसंगी चांदोरी सह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायखेडा येथील सहायक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.