Millets International Year : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त इगतपुरी तालुक्यात नागली प्रकल्प!

५५० हेक्टर क्षेत्रासह २०० शेतकऱ्यांना मिळणार प्रात्यक्षिक
Agriculture Officer distributing Nagli seeds to farmers through Agriculture Department
Agriculture Officer distributing Nagli seeds to farmers through Agriculture Department esakal
Updated on

Millets International Year : तालुक्यात खरिप हंगामात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त ५५० हेक्टरवर नागली प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासोबत तालुक्यातील २०० शेतकऱ्यांकडे नागली पिकांचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. (Nagli Project in Igatpuri Taluka on occasion of International Year of Millets nashik news)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील मांजरगाव, आंबेवाडी, वासाळी, इंदोरे, बारशिंगवे, खेड, कानडवाडी, भरवज, निरपण, कवडदरा, भंडारदरावाडी, शिरेवाडी, घोडेवाडी, सोनोशी, गंभीरवाडी, निनावी आदी गावांमध्ये ५५० हेक्टर क्षेत्रावर सुधारित फुले नाचणी कृषवान ह्या नागली पिकांचा प्रकल्प राबवला जाणार आहे.

या प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांचे माती नमुने शास्त्रीय पद्धतीने घेण्यात येऊन तपासणीसाठी मागील महिन्यात मृद चाचणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तपासणीचे अहवाल नागली लागवडीपूर्वी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत वाटप करण्यात येत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना योग्य खतांची मात्रा देता येईल. राहुलनगर येथे प्रकल्पानुसार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच अशोक बोराडे, गुलाब भले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाणे, शंकर चोथवे, विक्रम भोईर, भाऊराव भले, सुरेश भले, शरद भोईर, आनंद रोंगटे, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, कृषी सहाय्यक विजय कापसे, रमेश वाडेकर, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Agriculture Officer distributing Nagli seeds to farmers through Agriculture Department
Nashik News: सदिच्छानगरच्या ‘त्या’ भूखंडावर पुन्हा अतिक्रमण; कुंपणाचे बांधकाम सुरू केल्याने विरोध

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या असणाऱ्या परंतु मानवी आहारात अत्यंत महत्वाचा घटक असणाऱ्या नागली पिकाचा प्रसार व्हावा, शेतकऱ्यांना नागलीचे उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) यांच्यातर्फे कृषी विभागामार्फत २०० शेतकऱ्यांकडे नागली पिक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. दोन्ही प्रकल्पातील शेतकऱ्यांना नागली बियाणे एकरी २ किलो, तणनाशक, युरिया ब्रिकेट आदी निविष्ठा पुरवठा करण्यात येत आहेत.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने नागली पिकाची लागवड करून उत्पादन व उत्पादकता वाढवावी, यासाठी कृषी विभाग सहकार्य करणार आहे.

"आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तालुक्यात नागलीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे. नागलीसारख्या पिकाला शहरी भागात चांगली मागणी आहे. आहारातील महत्व वाढत असल्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. नागली पिकाकडे शेतकऱ्यांनी पुन्हा वळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे." -किशोर भरते, कृषी पर्यवेक्षक

Agriculture Officer distributing Nagli seeds to farmers through Agriculture Department
Nashik News: बिऱ्हाड मोर्चा इगतपूरीत मुक्कामी! ऊन-पावसाची तमा न बाळगता विविध मागण्यांसाठी मुंबईकडे कुच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.