नाशिक : राज्यातील बहुचर्चित नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास दुचाकी तसेच तीनचाकी व चारचाकी रिक्षांना परवानगी दिली जाणार नाही, तसेच चारचाकी वाहनांच्या वेगमर्यादेविषयी आज वाहतूक विभागाने अधिसूचना काढली आहे. त्यामुळे यापूर्वीच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतीमुळे चर्चेत असलेल्या या मार्गावरुन दुचाकीसह रिक्षांना परवानगी नसणार हेही स्पष्ट झाले आहे.
अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक कुलवंतकुमार सरंगल यांनी समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या वेगाच्या अनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
अशी असणार वेगमर्यादा
चालकासह ८ व्यक्तीची क्षमता असणारी एम १ या प्रकारातील वाहनांसाठी सपाट भागात ताशी १२० किमी व घाट-बोगद्याच्या भागात ताशी १०० किमी
चालकासह नऊ व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींची क्षमता असणाऱ्या एम १ व एम ३ या प्रकारांतील प्रवासी वाहनांसाठी सपाट भागात ताशी १०० किमी व घाट-बोगद्याच्या भागात ताशी ८० किमी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.