Nashik Namami Goda Project : ‘नमामि गोदा’ प्रकल्प लांबण्याची शक्यता; इको सेन्सेटिव्ह झोनचा समावेश करावा लागणार

godavari river
godavari riveresakal
Updated on

Nashik Namami Goda Project : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्यानिमित्ताने शहर विकास व गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा ‘नमामि गोदा’ प्रकल्प प्रशासकीय कामकाजात अडकला असताना आता नियमानुसार इको सेन्सेटिव्ह झोनचा समावेश प्रकल्पात करावा लागणार आहे.

यामुळे प्रकल्प लांबण्याची शक्यता पुन्हा वाढली आहे. महापालिकेने सल्लागार संस्थेला माहिती देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहिती मिळविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. (namami goda project Eco sensitive zones should be included nashik news)

२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प अस्तित्वात येणार आहे. जलशक्ती मंत्रालयाकडून प्रकल्पासाठी जवळपास १८०० कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. प्रकल्पात प्रामुख्याने नदी स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा भाग आहे.

नदी नाल्यांमध्ये वाहणारे सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविणे, अहमदाबादच्या साबरमती नदी प्रकल्पाच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, जैवविविधता जपणे, विविध घाटांचे नूतनीकरण करणे तसेच दहनभूमी अत्याधुनिक व प्रदूषणमुक्त करणे, नदीचा वाहता प्रवाह स्वच्छ ठेवणे, नदीकिनारी व घाटांवर असलेला घनकचरा संकलित करणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे, नदी प्रवाहातील जलचरांची निगा राखणे व जतन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, जलचरांच्या विविध प्रजाती पूर्ववत करणे व त्यांचे संवर्धन करणे, गोदावरी नदी वरील घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा प्रकल्पात समावेश आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.

त्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्त केली आहे. संस्थेमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणारे सुविधांचे जीआयएस मॅपिंग करून बेसमॅप तयार करण्याचे काम सुरू आहे. नगर नियोजन विभागाकडून ड्रोन सर्वे केला जाणार आहे. याचा डेटा घेऊन अस्तित्वातील सर्विसेसचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. ड्रोन सर्वे होत नसल्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यासाठी विलंब होत आहे. असे असताना आता इको सेन्सेटिव्ह झोनचा मुद्दा समोर येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

godavari river
Nashik Tomato Rate : आवक वाढल्याने टोमॅटो दरात घसरण; लिलावात सरासरी 1 हजाराचा भाव

प्रदूषण मंडळाकडे माहिती

प्रकल्प राबविताना गोदावरी नदी परिसरातील इको सेन्सेटिव्ह झोनचा विचार करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे.

इको सेन्सेटिव्ह झोनची माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रदूषण मंडळाकडून प्राप्त झालेली माहिती सल्लागार संस्थेला दिली जाणार असून, त्या आधारे प्रकल्पाचा बेस मॅप तयार केला जाणार आहे.

असा आहे प्रकल्प

- शहरातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती व क्षमतावाढ.

- मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिस्सारण केंद्र बांधणे.

- नवीन रहिवासी क्षेत्रातील मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविणे.

- नदी किनारा अत्याधुनिक करणे.

- गोदावरी घाटांचे नूतनीकरण व नवीन घाट बांधणे.

- औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापरासाठी यंत्रणा.

godavari river
Dada Bhuse News : पालकमंत्री उद्या घेणार महापालिकेची झाडाझडती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.