Nashik News: आचारसंहितेत अडकला Namami Goda Project; राज्य निवडणूक आयोगाकडे NMCने मागितली परवानगी

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नमामि गोदा प्रकल्प हाती घेतला आहे.
State Election Commission
State Election Commissionesakal
Updated on

Nashik News : नमामी गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारतर्फे नमामि गोदा प्रकल्प अमलात आणला जात असून त्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त केला जाणार आहे.

निविदेअंती प्रकल्प सल्लागाराला कार्यारंभ आदेश देण्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आड आली असून नमामी गोदा प्रकल्पासह पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाच्या अशा एकूण ३० कामांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी महापालिकेच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. (Namami Goda Project Stuck in Code of Conduct NMC sought permission from State Election Commission nashik news)

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नमामि गोदा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाकडे अठराशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावातंर्गत नमामि गोदा प्रकल्प राबविला जाणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत गोदावरी व उपनद्यांना लागून असलेल्या दीडशे किलोमीटर लांबीच्या मुख्यमलवाहकांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर उपनद्यांमध्ये वाहणारे मलजल अडविले जाणार आहे.

कामटवाडे व मखमलाबाद येथे मलनिस्सारण केंद्र उभारले जाणार आहे. नव नगरांमध्ये दोनशे ते सहाशे मिलिमीटर व्यासाच्या मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. नदीकाठी सुशोभीकरण करण्याबरोबरच घाटांचा विकास करणे, हेरिटेज डीपीआर तयार करणे, महापालिका क्षेत्रातील प्रदूषित पाणी मलनिस्सारण केंद्राच्या माध्यमातून रिसायकल करून पुन्हा नदीत सोडले जाणार आहे.

या प्रकल्प अमलात आणण्यासाठी केंद्र सरकारने सल्लागार संस्था नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने सल्लागार संस्था नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा प्रक्रियेअंती सल्लागार संस्था निश्चित करण्यात आली.

सल्लागार संस्थेला कार्यारंभ आदेश देणे बाकी आहे. मात्र, विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने कार्यारंभ आदेश देता येत नाही.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

State Election Commission
Nashik News : निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी Citylincच्या जादा बसेस

पाणीपुरवठा व मलनिस्सारणाची कामे अडकली

नमामि गोदा प्रकल्प राबवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार संस्थेला कार्यारंभ आदेश देण्याबरोबरच मलनिस्सारण व पाणी पुरवठा विभागाची कामे देखील आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहेत.

जलवाहिनी दुरुस्त करणे, जलवाहिन्या टाकणे, मलवाहिका दुरुस्ती व नवीन मलवाहिका टाकणे आदी तीस प्रकारची कामे कार्यारंभ आदेश देण्याच्या पातळीवर आहे.

त्या अनुषंगाने नमामि गोदा प्रकल्पासह पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाच्या जवळपास ३० कामांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी. अशी विनंती महापालिकेने राज्याच्या नगर विकास विभागात मार्फत पत्राद्वारे केली आहे.

State Election Commission
Nashik News : खंडित वीजप्रश्‍नी शेतकऱ्यांचा ठिय्या; 8 तास सुरळीत विजेची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.