NAMCO Bank Election : ‘नामको’ बॅंक निवडणूक; भवर पुरावे सादर करू शकले नाही

NAMCO Bank Election
NAMCO Bank Electionesakal
Updated on

NAMCO Bank Election : नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक सोहनलाल भंडारी यांसह १० संचालकांविरोधात उमेदवार संदीप भवर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने बुधवारी (ता.१३) फेटाळून लावली आहे.

संचालकांविरोधात ठोस पुरावे तीन दिवसात सादर न केल्याने त्यांची याचिका फेटाळली.(Namco Bank could not submit evidence before election nashik news)

गतवेळेप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत याचिका फेटाळल्याने अपक्ष उमेदवार भंवर यांना दणका बसला आहे. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी प्रगती पॅनेल विरोधात सात अपक्ष रिंगणात आहे.

अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान संदीप भवर यांनी यापूर्वीच्या बारा संचालकांकडून सुमारे साडे तीन कोटी रुपये वसुल करण्याचे आदेश असल्याने सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने, कांतिलाल जैन अविनाश गोठी, शोभा छाजेड यांच्यासह बारा संचालकांचे अर्ज अवैध ठरवावे अशी हरकत घेतली होती.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: नामकोच्या निवडणुकीत भाजपने घातले लक्ष; स्वतंत्र पॅनेल बनविण्याच्या हालचाली

ती निवडणूक अधिकारी फयाज मुलानी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर फेटाळत सर्व उमेदवार वैध ठरविले होते. त्यावर भंवर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. माघारीच्या अंतिम दिवशी सोमवारी (ता.११) सुनावणी होणार होती.

याच दरम्यान गत निवडणुकीतील अनुभव पाहता विद्यमान संचालक मंडळाने जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात यापूर्वीच कॅव्हेड दाखल केलेले होते. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने भंवर यांच्याकडे ठोस पुराव्याची मागणी केली. मात्र, भंवर तीन दिवसात कोणतेही पुरावे देऊ शकले नाही. त्यामुळे न्यायालयाने याचिका फेटाळली असल्याचे सांगितले जात आहे.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: ‘नामको’त सत्ताधारी पॅनलची लागणार कसोटी; सभासदांपर्यंत पोचण्यास करावी लागणार कसरत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.