NAMCO Bank Election: ‘नामको’बॅंक निवडणुकीत अपक्षांमुळे रंगत! 19 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात

Major candidates including Gajanan Shelar withdrawing from the Merchant Bank elections. In the second picture, the dispute between the ruling group and Shelar supporters when they came to withdraw after the deadline.
Major candidates including Gajanan Shelar withdrawing from the Merchant Bank elections. In the second picture, the dispute between the ruling group and Shelar supporters when they came to withdraw after the deadline.esakal
Updated on

नाशिक : नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडींनंतर विरोधी सहकार पॅनेलचे नेते गजानन शेलार यांसह त्यांच्या प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीतून अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने सत्ताधाऱ्यांसाठी एकतर्फी झाली आहे.

सत्ताधारी प्रगती पॅनलने विरोधी पॅनेलला उमेदवारी मिळू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अनेकांची मनधरणी केली. मात्र, अखेर संदीप भवर यांच्यासह पाच अपक्ष रिंगणात राहिल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे. (NAMCO Bank Electio being fought by independents 26 candidates in fray for 19 seats nashik)

अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. ११) अंतिम दिवशी १४४ जणांनी माघार घेतली. सर्वसाधारण गटातून १८ जागांसाठी २४ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. अनुसूचित जाती- जमाती गटातून एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहे.

महिला राखीवच्या दोन जागांसाठी दोन महिला उमेदवार रिंगणात राहिल्याने सपना आनंद बागमार व शीतल सूरज भट्टड यांची निवड बिनविरोध मानली जात आहे.

रिंगणातील उमेदवारांना मंगळवारी (ता.१२) चिन्ह वाटप केले जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी फयाज मुलानी यांनी दिली.

शेलारांसह ‘सहकार’ची माघार

माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय नाटयमय घडामोडीनंतर अखेरच्या क्षणी सहकार पॅनेलचे नेते माजी संचालक गजानन शेलार यांसह त्यांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी माघार घेतली. दुपारी अडीचच्या सुमारास बॅंकेत शेलारासह उमेदवार दाखल झाले.

शेलार समर्थकांनी सत्ताधारी पॅनलच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तीनच्या सुमारास शेलार यांसह सर्व प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली.

शेलार यांनी माघार घेतल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पॅनेलमध्ये उमेदवार असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात उमेदवारी करण्यासाठी कोणीही इच्छुक नसल्याचे दिसून आले.

सत्ताधारी गटाने विरोधी पॅनेलला उमेदवार मिळू नये यासाठी अनेक डावपेच आखले. परिणामी विरोधी पॅनेलला अनेक संवर्गात उमेदवारच मिळाले नाही.

पॅनलची भिस्त असणाऱ्या उमेदवारांनीच माघारी घेतल्याने शेलार यांच्यावर नामुष्की ओढविली. त्यामुळे शेलार यांसह उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेणे भाग पडले.

"सर्व संवर्गातून पॅनलसाठी उमेदवारी करण्यासाठी उमेदवार तयार होते. परंतु, विरोधकांनी उमेदवारांवर दबाव टाकला. राज्यात मराठा व ओबीसी संघर्ष सुरू आहे, यात बँकेच्या निवडणुकीतही जातीय तेढ निर्माण होऊ नये तसेच बॅंकेत जाती-पातीचे राजकारण नको यासाठी पॅनेल दिले नाही. कोणत्याही लोभाला बळी न पडता माघारी घेतली आहे."

- गजानन शेलार, सहकार पॅनलचे नेते.

Major candidates including Gajanan Shelar withdrawing from the Merchant Bank elections. In the second picture, the dispute between the ruling group and Shelar supporters when they came to withdraw after the deadline.
Nashik News: पालखेड कालव्याला आज आवर्तन सुटणार! दुष्काळी येवल्यासह निफाडमधील शेतकऱ्यांना लाभ

प्रगतीकडून चार नव्यांना संधी

सत्ताधारी प्रगती पॅनेलने अखेरच्या क्षणी विद्यमान चार संचालकांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात महिला संचालक शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, शिवदास डागा, संतोष धाडिवाल यांना उमेदवारी न देता शीतल भट्टड, सपना बागमार, देवेंद्र पटेल, ललितकुमार मोदी यांना उमेदवारी दिली आहे.

(स्व) हूकुमचंद बागमार यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे तर, गतवर्षी विरोधी गटात असलेले ललितकुमार मोदी यांना पॅनेलने उमेदवारी दिली आहे.

शोभा छाजेड यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आकाश छाजेड यांना तर, (स्व) बागमार यांच्या नातसून असलेल्या सपना बागमार यांना उमेदवारी मिळाली आहे.

दरम्यान माघारीनंतर सत्ताधारी प्रगती पॅनलकडून सभासदांचा मेळावा घेत, पॅनल नेते माजी आमदार वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने यांनी पॅनल उमेदवारांची घोषणा केली. प्रगती पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (ता.१२) त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे.

प्रगती पॅनलचे उमेदवार

सर्वसाधारण गट (१८ जागा) - वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने, अविनाश गोठी, नरेंद्र पवार, ललितकुमार मोदी, अशोक सोनजे, गणेश गिते, महेंद्र बुरड, सुभाष नहार, प्रफुल्ल संचेती, रंजन ठाकरे, हरीश लोढा, आकाश छाजेड, भानुदास चौधरी, प्रकाश दायमा, देवेंद्र पटेल. महिला राखीव (दोन जागा) सपना आनंद बागमार व शीतल सूरज भट्टड. अनुसूचित जाती-जमाती (१ जागा) प्रशांत दिवे.

रिंगणातील अपक्ष उमेदवार

संदीप भवर, अॅड. सुधाकर जाधव, संजय नेरकर, विजय बोरा, कपिलदेव शर्मा, महेंद्र गांगुर्डे

अनुसूचित जाती-जमाती - विलास जाधव

Major candidates including Gajanan Shelar withdrawing from the Merchant Bank elections. In the second picture, the dispute between the ruling group and Shelar supporters when they came to withdraw after the deadline.
Sushma Andhare News: पालकमंत्री दादा भुसेंनी लपविले ड्रग्जप्रकरण : सुषमा अंधारे यांची टीका

भवर, बोरा रिंगणात

सोहनलाल भंडारी यांसह ११ विद्यमान संचालकांवर हरकत घेतली होती. निवडणूक अधिकारी यांनी हरकत फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली.

हरकत घेणारे संदीप भवर यांनी माघार न घेतल्याने रिंगणात राहिले आहे. याशिवाय विजय बोरा यांनी हरकती नोंदविली होती. ते देखील रिंगणात राहिले आहे.

असे रंगले माघारीचे नाटय

निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक उमेदवारांचे नाटय रंगल्याचे बघावयास मिळाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते व त्यांचे पुतणे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्यात शाब्दीक वाद झाले.

अखेरच्या क्षणी दिगंबर गिरे, नरेंद्र गिते यांना माघारी घेतली. कमलेश बोडके यांची माघारीसाठी मोठी दमछाक झाल्याचे बघावयास मिळाले. सहकार पॅनेलला उमेदवार मिळू नये यासाठी वसंत गिते, सोहनलाल भंड़ारी, हेमंत धात्रक यांनी अनेक उमेदवारांची यावेळी मनधरणी केली.

अन माघारी राहून गेली, निवडणूक लागली...

अर्ज माघारीची वेळ संपुष्टात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून काही उमेदवारांचे अर्ज माघारीसाठी घेऊन आले. मात्र, त्यावर गजानन शेलार यांच्या गटाने आक्षेप घेतले. मुदत संपली असल्याने माघारी घेऊ नये अशी मागणी केली.

यावरून दोन्ही गटात वादंग झाले. दोन्ही गट एकमेकांवर ओरडू लागले. बॅंकेचा खर्च वाचेल असे सांगत माघारी घेऊ द्या अशी मागणी सत्ताधारी गटाने केली मात्र, ती होणार नाही, वेळेत का घेतली नाही असा प्रश्न शेलार गटाच्या कार्यकर्त्यांनी करत त्यांना रोखले.

हा वाद सुरू राहिल्याने निवडणूक अधिकारी यांनी वेळ संपल्याचे जाहीर करत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर सत्ताधारी गटाच्या उमेदवारांसह नेते निघून गेले. शेलार समर्थकांनी अर्जदेखील निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिला.

या वादामुळे अनुसूचित जाती जमाती गटातील एक उमेदवारांची माघार राहून गेली. परिणामी या गटात दोन उमेदवार शिल्लक राहिल्याने निवडणूक होत आहे.

Major candidates including Gajanan Shelar withdrawing from the Merchant Bank elections. In the second picture, the dispute between the ruling group and Shelar supporters when they came to withdraw after the deadline.
Mumbai News: मुंबई विमानतळावर इंडिगो विमानाचे पार्किंग ब्रेक फेल! दोष वेळीच लक्षात आल्याने दुर्घटना टळली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.