NAMCO Bank Election: शरद पवार गट राहिला बाजूला; राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीय उमेदवार रिंगणात

NAMCO Bank Election
NAMCO Bank Electionesakal
Updated on

NAMCO Bank Election: जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची आर्थिक नाडी असलेल्या नाशिक मर्चन्ट बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाही म्हणता, म्हणता यंदा राजकारणाचा शिरकाव झाला.

सत्ताधारी प्रगती पॅनेलने त्यादृष्टीनेच सर्वपक्षीयांना सोबत घेत उमेदवारी दिली, मात्र यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शरद पवार गट बाजूला राहून गेला. (NAMCO Bank Election Candidates from all parties except NCP nashik news)

सत्ताधारी प्रगती पॅनेलला टक्कर देण्यासाठी सहकार पॅनेलचे गजानन शेलार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला त्यात यश न आल्याने या गटाचा आता एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरलेला नाही.

जिल्ह्यासह परराज्यात बॅंकेचे कार्यक्षेत्र असल्याने बॅंकेच्या निवडणुकीकडे सहकार सोबतच राजकीय लोकांचे लक्ष लागून असते. सहकारात राजकारण, पक्ष नसल्याची ओरड केली जाते. मात्र, प्रत्यक्षात यंदाच्या निवडणुकीत राजकीय अजेंडा दिसून आला. मतदारांमध्ये शहरातील तिन्ही मतदारसंघ यातही मध्य विधानसभेतील मतदारांचे प्राबल्य असल्याने आगामी निवडणुकीचे आखाडे या निवडणुकीतून बांधले जात आहे.

सत्ताधारी प्रगती पॅनेलचे नेतृत्व करणाऱ्यांनी प्रामुख्याने याची काळजी घेत पॅनेलची निर्मिती केल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांपासून पॅनेलची सत्ता असल्याकारणाने, पॅनेलच्या उमेदवारीसाठी अनेकांचा प्रयत्न झाला.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election : ‘नामको’ बॅंक निवडणूक; भवर पुरावे सादर करू शकले नाही

त्यासाठी भाजप, राष्ट्रवादी असो की इतर पक्षांच्या वरिष्ठांनी उमेदवारीसाठी फोन केले. परंतु, पुढील समीकरणे लक्षात घेऊन सामाजिक व सर्वपक्षीय राजकीय उमेदवार रिंगणात पॅनेलने उतरविले. यात राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचे उमेदवार आहे. परंतु, शरद पवार गटाचे उमेदवार नसल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांचे विश्वासू असलेले शिवदास डागा याची उमेदवारी वयामुळे नाकारण्यात आली. विरोधी सहकार पॅनलचे नेते शेलार यांच्या पॅनलमधून हा गट रिंगणात राहील असे वाटत होते. प्रत्यक्षात शेलार यांनी सामाजिक व राजकीय नेत्यांची जुळवाजुळव करता न आल्याने, ऐनवेळी पॅनेलला माघारी घेण्याची नामुष्की ओढविली.

याचा परिणाम म्हणजे या गटाचे एकही उमेदवार आता रिंगणात राहिलेले नाही. संदीप भवर यांच्या रूपाने मनसे देखील रिंगणात दिसत असताना राष्ट्रवादीचा पवार गट हा उपेक्षितच राहून गेला असे म्हटले तर, फारसे वावगे ठरणार नाही.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: ‘नामको’त सत्ताधारी पॅनलची लागणार कसोटी; सभासदांपर्यंत पोचण्यास करावी लागणार कसरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()