NAMCO Bank Election: नामको बँकेसाठी पॅनेल निर्मितीच्या हालचाली; 172 उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध

NAMCO Bank Election
NAMCO Bank Electionesakal
Updated on

NAMCO Bank Election: नाशिक मर्चन्ट बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्जाच्या छाननीत सहा अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. प्राप्त तिन्ही हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.

आता २१ जागांसाठी १७२ उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक अधिकारी फयाज मुलानी यांनी मंगळवारी (ता. ५) जाहीर केली. बुधवारपासून (ता.६) माघारीला सुरवात होणार आहे. दरम्यान, अर्ज छाननी झाल्यानंतर आता पॅनेल निर्मितीला दोन्ही गटांकडून हालचालींना वेग आला आहे.

बँकेच्या २१ जागांसाठी १७८ सभासदांनी २७२ अर्ज दाखल केले होते. अर्जाची छाननी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात सोमवारी झाली. (NAMCO Bank Election Final list of 172 candidates published nashik news)

सर्वसाधारण मतदार संघातील १३८ अर्जांपैकी १३४ वैध तर चार अवैध ठरले आहे. महिला राखीव मतदारसंघातील ३० पैकी २८ वैध तर २ अवैध ठरले. अनुसूचित जाती- जमाती मतदारसंघातील सर्वच १० सभासदांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. संदीप भवर व विजय बोरा यांनी घेतलेल्या हरकती सोमवारी रात्री उशिराने फेटाळण्यात आल्या होत्या.

येवला मर्चंट बँकेचे माजी संचालक मनीष काबरा यांच्याविरुद्ध अशोक संकलेचा यांनी तिसरी हरकत घेतली होती. यात काबरा यांच्याविरुद्ध कर्ज वाटपामध्ये कलम ८८ नुसार ठपका ठेवण्यात आला असून त्यास कुठे स्थगिती देण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे.

मात्र कलम ८८ मधील तरतुदीनुसार काबरा यांच्यावर २४ जानेवारी २०२२ च्या आदेशाने जबाबदारी ठेवल्याचा आदेश रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. तसा पुरावा सादर करण्यात आल्याने संकलेचा यांची हरकतही फेटाळण्यात आली आहे. बुधवारपासून माघारीला सुरवात होणार असून १२ नोव्हेंबरपर्यंत माघारीचा कालावधी आहे.

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली! 21 जागांसाठी विक्रमी 272 उमेदवारी अर्ज दाखल

सत्ताधारी व विरोधी पॅनलकडून आता पॅनेल निर्मितीसाठी बैठका सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी पॅनेलकडून काही नव्या चेहऱ्यांचा शोध सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमका कोणाचा पत्ता कट होतो याकडे लक्ष आहे. विरोधी पॅनेलकडूनही उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी नेतृत्वाकडून भेटीगाठीचे सत्र सुरू आहे.

यांचे अर्ज ठरले अवैध (कंसात अर्ज अवैध ठरल्याची कारणे)

विलास आंधळे ( बँकेविरुद्ध वकिली / कायदेशीर सल्लागार म्हणून कामकाज करणे), चारुहास घोडके ( बँकेचे अधिकृत मूल्यांकनकार), सरला जाधव ( अनुमोदकाची स्वाक्षरी नाही), अमृतलाल पिपाडा (बँकेचे अधिकृत वकील / कायदेशीर सल्लागार पॅनेलवर नियुक्त), रेखा गायधनी (बँकेचे अधिकृत वकील/कायदेशीर सल्लागार पॅनेलवर नियुक्त), सुवर्णा सोनवणे (सूचकाची स्वाक्षरी नाही)

"आम्ही दिलेल्या पुराव्यांची प्रत विचारात न घेता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल दिला आहे. हा निकाल अमान्य असून या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे." - संदीप भवर (हरकतदार)

NAMCO Bank Election
NAMCO Bank Election: गिते, साने, भंडारी, छाजेड, जैन, गोठींचे अर्ज वैध; हरकती फेटाळल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.