NAMCO Bank Election Result : महाराष्ट्रासह राज्याबाहेरील व्यापाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह (नामको) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनेलच्या सर्व २१ उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.
मतदारांनी विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना सपशेल नाकारल्याने त्यांच्यावर डिपॉझिट जप्त करण्याची नामुष्की ओढावली. विजयी उमेदवारांची घोषणा होताच गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान सपना आनंद बागमार आणि शीतल सूरज भट्टड यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.
‘नामको’ बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (ता.२४) सुमारे ३० टक्के मतदान झाले. बँकेत एकूण २१ संचालक निवडायचे असले तरी महिलांच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. (NAMCO Bank Election Result nashik political)
त्यामुळे १९ जागांसाठी रिंगणात असलेल्या २६ जणांसाठी मतदान घेण्यात आले. सोमवारी (ता.२५) सिडकोतील राजे संभाजी स्टेडीयम येथे मतमोजणी झाली. मतमोजणीस १०८ टेबलवर मतपेट्यांची विभागणी करून प्रत्येकी तीन फेऱ्या करण्यात आल्या.
पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी प्रगती पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. दुपारी पहिल्या व सायंकाळी दुसऱ्या फेरीच्या निकालाची घोषणा झाली. त्यानंतर विरोधी पॅनेलच्या उमेदवारांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. विरोधी गटातील एकाही उमेदवाराला पाच अंकी संख्या गाठता आली नाही.
विजयी उमेदवारांमध्ये प्रशांत दिवे, वसंत गिते यांना सर्वाधिक मते मिळाली. सोहनलाल भंडारी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. सायंकाळी आठला अंतिम निकालाची घोषणा होताच उमेदवारांनी गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष साजरा केला.
यंदा ललित मोदी, ॲड. आकाश छाजेड, देवेंद्र पटेल, महिला गटातून सपना बागमार, शीतल भट्टड या ५ उमेदवारांना प्रगती पॅनलने संधी दिली होती. त्यात सर्वांचा विजय झाला आहे. गतवेळी शोभा छाजेड या निवडून आल्या होत्या. यंदा त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव ॲड. आकाश छाजेड यांना संधी देण्यात आली.फय्याज मुलानी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते.
मतमोजणी सुरु असताना एका पेटीत मतमोजणी प्रतिनिधींना चिठ्ठी आढळली. त्यात उमेदवारांनी जातिवाद करू नये, बँकेचा खर्च कमी करावा. घरच्या गाड्या वापराव्यात यांसह दोन ज्येष्ठ संचालकांनी बँकेच्या सभासदांशी व्यवस्थित बोलावे. फार हवेत राहू नये, अशा कानपिचक्या दिल्या आहेत. चांगल्या लोकांनाच कर्ज देण्याचा सल्लाही या चिठ्ठीतून दिल्याने मतमोजणी केंद्रावर या चिठ्ठीची फार चर्चा होती.
'‘नामको’ची आर्थिक उलाढाल पाच हजार कोटींपर्यंत पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट राहणार आहे. काळानुरुप बँकेत बदल करून संगणकीकरण करण्यात येईल. विरोधकांच्या अनाठायी अट्टहासामुळे नामको बँकेला निवडणूक खर्चातून दीड ते दोन कोटी रुपयांचा भुर्दंड बसला. या निकालातून त्यांनी धडा घेतला पाहिजे.'' - वसंत गिते, विजयी उमेदवार
उमेदवारनिहाय मिळालेली मते
प्रशांत दिवे : ५००४३
वसंत गिते : ४९६८८
सोहनलाल भंडारी : ४९५३१
हेमंत धात्रक : ४९०९३
महेंद्र बुरड : ४८९३७
गणेश गिते : ४८८६२
भानुदास चौधरी : ४८७९२
नरेंद्र पवार : ४८७२५
आकाश छाजेड : ४८६६४
प्रकाश दायमा : ४८५४७
सुभाष नहार : ४८३७४
हरीश लोढा : ४८३६६
ललितकुमार मोदी : ४८२३९
विजय साने : ४८१८१
अविनाश गोठी : ४८१०९
अशोक सोनजे : ४८०१४
प्रफुल्ल संचेती : ४७७९६
रंजन ठाकरे : ४७७७६
देवेंद्र पटेल : ४७७१९
संदीप भवर : ४१११
महेंद्र गांगुर्डे : ३५४५
संजय नेरकर : ३४४०
ॲड.सुधाकर जाधव : ३४३०
विजय बोरा : ३३८५
विलास जाधव : ३३२८
कपिलदेव शर्मा : २७४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.