Nashik News: नामपूर बाजार समिती राज्यात सातवी! विभागात चौथे तर जिल्ह्यात तिसरे मानांकन

Nampur Market Committee
Nampur Market Committeeesakal
Updated on

नामपूर : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत नामपूर बाजार समितीला जिल्ह्यात तिसऱ्या, नाशिक विभागात चौथ्या, तर राज्यात सातव्या क्रमांक मिळाला आहे.

पणन संचालनालयाचे सहसंचालक दीपक शिंदे यांनी राज्यातील ३०५ बाजार समित्यांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे.

राज्यभरातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी जाहीर झाली आहे. गतवर्षी नामपूर बाजार समितीला जिल्ह्यात चौथे, तर विभागात आठवे नामांकन मिळाले होते. (Nampur Bazaar Committee seventh in state Ranked 4th in division and 3rd in district Nashik News)

३० एप्रिल २०१५ रोजी नामपूर येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. मोसम खोऱ्यातील सुमारे ९३ गावे बाजार समितीला जोडली आहेत. बैल बाजार हे येथील वैशिष्ट्ये आहे. त्यानंतर उपबाजार आवारात धान्य व भुसार मालाचा लिलाव, कांदा खरेदी केंद्र, डाळिंब लिलाव मार्केट आदी सेवा सुरू झाल्यामुळे बाजार समितीला मिळू लागले. शेतकरी हिताच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लासलगाव, पिंपळगाव बाजार समित्यांच्या धर्तीवर रोखीने लिलावाची रक्कम मिळत आहे.

पायाभूत सुविधा व इतर सेवा-सुविधा अंतर्गत रस्ते, सामाईक लिलावगृह, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, शेतमाल साठविण्यासाठी गोदाम, शीतगृह सुविधा, स्वच्छता व प्रतवारी सुविधा, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, संगणकीकरण, पुरविलेली सुविधा, खरेदीदारांचे प्रमाण, आर्थिक वार्षिक उत्पन्न, बाजार फी, वाढावा आदी निकषाच्या आधारावर नामपूर बाजार समितीला २०० पैकी १५५.५ गुण मिळाले आहेत.

--------------

असे आहे गुणदान...

पायाभूत सुविधा व इतर सेवा-सुविधा अंतर्गत १४ निकष असून त्यासाठी ८० पैकी ६० गुण, आर्थिक कामकाजाबाबत ७ निकष ३५ पैकी ३२.५ गुण, वैधानिक कामकाजाबाबत ११ निकष- ५५ पैकी ४५ गुण तर योजना उपक्रमातील सहभाग व इतर विषयी ३ निकष असून त्यासाठी ३० पैकी १८ गुण असे १५५.५ गुण नामपूर बाजार समितीला मिळाले आहेत.

---------

05062

नामपूर बाजार समिती राज्यात सातव्या क्रमांकावर असल्याची समाधानकारक बाब आहे. सभापतीपदाच्या अत्यल्प काळात कांदा लिलावासाठी टोकण पद्धत सुरू करून शिस्तप्रिय कारभाराला पसंती दिली. बाजार समितीच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी बाजार समित्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल.

-भाऊसाहेब अहिरे, सभापती नामपूर बाजार समिती

Associated Media Ids : NAM23B0506

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.