Nashik News : येथील बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी/अडते, हमाल, मापारी गटांसाठी १९६ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून शुक्रवारी (ता.८) ४९ उमेदवारांनी नामांकनपत्रे दाखल केली आहेत.
शनिवार, रविवार शासकीय सुट्टी असल्यामुळे नामांकनपत्र विक्री बंद राहणार असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामुळे शुक्रवारी बाजार समितीला यात्रेचे स्वरुप आले होते. (Nampur Bazaar Samiti form of Yatra Crowd of applicants due to holidays Nashik News)
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (ता.११) अंतिम मुदत असल्याने मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी (ता.८) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केल्याने बाजार समितीच्या आवाराला यात्रेचे स्वरूप आले होते.
यंदा सोसायटी, ग्रामपंचायत गटासह शेतकऱ्यांनाही उमेदवारी करण्याची संधी सहकार विभागाने दिल्याने शेतकरी गटातही उमेदवारी अर्ज दाखल झाले.
पॅनेलमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू असून इच्छुक उमेदवारांचा आकडा 'शंभरी' पार होणार असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी पुढारी, समर्थकांच्या गर्दीने बाजार समितीचे आवार फुलून गेले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारी घेतलेले उमेदवार यंदा मोठ्या जोमाने रिंगणात उतरले आहेत.
शुक्रवारी (ता.८) साहेबराव कांदळकर, मनीषा पगार, सुरेश महाजन, दादाजी भारती, माधवराव पाटील, सयाजी देवरे, संजय खिवसरा, आसखेडा येथील सरपंच दीपक कापडणीस, राकेश देवरे, उत्तम भोये, सोमपूर सहकारी सोसायटीचे सभापती गिरीश भामरे, टेंभे वरचे येथील सरपंच किरण वाघ,
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्राथमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष अरुण कापडणीस, दिनकर भामरे, केदा जाधव, सचिन मुथा, विलास निकम, मधुकर कापडणीस, दादाजी खैरनार, सारदे येथील सरपंच भरत देवरे, जितेंद्र बडजाते,
उपसभापती भाऊसाहेब कांदळकर, धर्मेंद्र कोर, शरद अहिरे, प्रवीण सावंत, मंगला कापडणीस, प्रशांत देवरे, परेश कोठावदे, लक्ष्मण गांगुर्डे, पोपट ठाकरे, मधुकर देवरे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
१४ सप्टेंबरला सुनावणी
४ ऑगस्टला विद्यमान संचालक मंडळाला सहा महिन्यांची राज्य शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर त्याविरोधात आकाश भामरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर २९ तारखेला उच्च न्यायालयाने मुदतवाढीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.
त्यानंतर बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम ५ सप्टेंबरला जाहीर केला. सहकार विभागाच्या निवडणूक जाहीर केल्याच्या निर्णाया विरोधात शेतकरी साहेबराव देसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सदर दोन्ही याचिका एकत्र करून १४ तारखेला निवडणुकीच्या निर्णयाबाबत सुनावणी होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.