Onion News : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात १ हजार ३०० वाहनांमधून सुमारे ३० हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.
उन्हाळ कांद्याला २ हजार १०० ते २ हजार ३५० रुपये प्रती क्विंटल असा सर्वोच्च, १ हजार ८०० रुपये असा सरासरी भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब अहिरे, उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी दिली. (Nampur received 30 thousand quintals of onions 2 thousand 100 to 2 thousand 350 rupees per quintal nashik)
मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील भरून निघत नव्हता. गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाल्याने केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य ४० टक्के वाढवल्याने कांदाउत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यात विविध शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलने करण्यात आली. जिल्ह्यातील बाजार समित्या सुरळीतपणे सुरू झाल्याने गुरुवारी (ता.२४) येथील बाजार समिती करंजाड उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.
मोसम खोऱ्यासह परिसरात यंदा विक्रमी कांदा शेतकऱ्यांकडे होता. परंतु रोगट हवामानामुळे कांद्याचे आयुष्य कमी झाल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब झाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत आहे. कांद्याचे दर काही प्रमाणात टिकून असल्याने उन्हाळ कांद्याची बाजारात विक्रमी आवक होत आहे.
आदिवासी पट्टा, साक्री तालुका आदी ठिकाणाहून येथील बाजार समितीत, करंजाड उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. सकाळी दहापासून लिलावाला सुरुवात झाली.
नामपूरला ७६८ वाहने तर करंजाडला ५२३ वाहनांचे लिलाव करण्यात आले. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे आणि गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.