Nashik Crime News : कोंबडी खाद्य अपहार प्रकरणातील 'तो' शेतकरी पोलिसांच्या रडावर

chicken feed embezzlement crime
chicken feed embezzlement crimeesakal
Updated on

Nashik Crime News : निर्धारित ठिकाणी डिलिव्हरी न पोहोचवता कोंबडी खाद्याच्या दीडशे गोण्यांचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर वावी पोलिसांनी मीठसागरे- पुतळेवाडी या गावांच्या शिवारातील पोल्ट्री फार्म मधून शंभर गोण्या कोंबडी खाद्य हस्तगत केले होते.

तपासाअंती या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर नाना कोंडाजी चतुर रा. मीठसागरे याची वावी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. (nana chatur farmer is suspect in case of chicken feed embezzlement nashik crime news)

अहमदनगर येथून कोंबडी खाद्य घेऊन सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे येथे शंभर गोण्या खाली केल्यावर ट्रक चालकाने इगतपुरी येथे न जाता तीन लाख रुपये किमतीच्या दीडशे गोण्या मीठसागरे-पुतळेवाडी शिवारातील पोल्ट्री फार्म खाली केल्या होत्या.

वावी येथील हमालीचे काम करणाऱ्या दोघा तरुणांनी तीन पोल्ट्री फार्मवर या गोण्या उतरवल्याचे समजल्यावर त्यांना विश्वासात घेत वावी येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण नवले यांनी हा प्रकार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या कानावर टाकला. खाद्य वाहतूक करणारा ट्रक वावी येथे शिर्डी महामार्गावर सोडून देत ट्रकचा चालक पसार झाला होता.

ट्रक मालकाची संपर्क झाल्यावर दुसऱ्या दिवशी कंपनीचे प्रतिनिधी व ट्रक मालक यांनी पोलीस ठाण्यात येऊन चालकाच्या विरुद्ध तक्रार नोंदवली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chicken feed embezzlement crime
Nashik Fraud Crime: वराला अडीच लाखाचा गंडा घालत नववधू गायब! दागिन्यांसह घरातील पैशांची केली चोरी

दरम्यान श्री. नवले यांच्या माध्यमातून पोलिसांनी मीठसागरे-पुतळेवाडी शिवारातील बाबासाहेब मोरे, धोंडिबा मोरे या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्म वर खाली केलेल्या शंभर गोण्या हस्तगत केल्या.

या शेतकऱ्यांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर मीठसागरे येथील नाना चतुर यांचे नाव समोर आले. या दोघा शेतकऱ्यांनी आपले पोल्ट्री फार्म चतुर यांना वार्षिक कराराने चालवण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यामुळे शेडवर खाली केलेल्या खाद्याच्या गोण्या श्री. चतुर यांनीच खाली केल्याचे निष्पन्न झाले.

गोण्या खाली करत असताना दोन्ही ठिकाणी श्री. चतुर हेच उपस्थित होते असे हमाली करणाऱ्या तरुणांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे खाद्यगोण्याच्या अपहारात सहभागामुळे संशयित म्हणून श्री. चतुर यांचा समावेश केला असल्याची माहिती हवालदार दशरथ मोरे यांनी दिली. अद्याप या प्रकरणात श्री. चतुर यांना अटक करण्यात आली नसली तरी पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा त्यांचे जाबजबाब नोंदवल्याचे समजते.

chicken feed embezzlement crime
Nashik Crime News : सिडकोत गावागुंडांनी केली वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.