‘Ramleela'च्या पडद्यामागील रंगभूषाकार नाना; रोज करतात 50 कलावंतांचा ‘मेकअप'

Nana Jadhav dressing up Priya Surte who played the role of Sita in Gandhinagar's Ramleela.
Nana Jadhav dressing up Priya Surte who played the role of Sita in Gandhinagar's Ramleela. esakal
Updated on

नाशिक : येथील गांधीनगरच्या दीर्घ परंपरा लाभलेल्या रामलीलामधील सर्व पात्रांचे रंगभूषेचे काम जाधव कुटुंब करत आहे. १९५७ मध्ये पहिल्या प्रयोगात (कै.) बाळासाहेब जाधव यांनी सुरू केलेले रंगभूषाकाराचे काम त्यांचा मुलगा नाना ऊर्फ रवींद्र जाधव हे सांभाळत आहेत.
आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले नानांनी ऐतिहासिक रंगभूषाकार म्हणून कला क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. गेल्या तीस वर्षांपासून ते गांधीनगरच्या रामलीलामधील सर्व कलावंतांचे मोफत ‘मेकअप’ करतात. (Nana Jadhav Makeup man behind Ramleela success Nashik Latest Marathi News)

‘मेकअप’ मध्ये ते स्वतः बनवलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करतात. त्यामुळे कलावंतांच्या चेहऱ्यावर कोणतेही ‘साईड इफेक्ट’ होत नाहीत. नाना म्हणाले, की लेखक आणि दिग्दर्शकांना अभिप्रेत असलेली व्यक्तिरेखा उभी करणे हे आव्हानात्मक काम आहे. कारण त्यात भौगोलिक स्थिती, शारीरिक ठेवण, काळ या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. शिवाय नाटक आणि चित्रपट ही दोन्ही माध्यमे वेगळी आहेत, हे ओळखून काम करावे लागते.

पाच तासात रोज पन्नास कलावंतांचे मेकअप करण्यात येते. नाशिकमध्ये कुठंही लोकनाट्य, बोहाडे, सोंग असे कार्यक्रम असल्यावर नानांना रंगभूषेसाठी बोलविले जाते. नानांनी अनेक नाटकांच्या कलावंतांची रंगभूषा केली. उपेंद्र दाते यांचा ‘रंगमंच’, ‘नटसम्राट’, ‘इथं ओशाळला मृत्यू',‘रायगडला जेंव्हा जाग येते’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क' अशा व्यावसायिक नाटकांमध्ये रंगभूषा केली आहे. ‘बंदुक्या’, ‘फरफट’ आदी चित्रपटात रंगभूषाकार म्हणून त्यांना संधी मिळाली.

Nana Jadhav dressing up Priya Surte who played the role of Sita in Gandhinagar's Ramleela.
Navratri 2022 : देवीचा पालखी सोहळा अन् नगरप्रदक्षिणा; गडावर फडकणार कीर्तिध्वज

राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, अखिल भारतीय नाट्य संमेलन आदी ठिकाणी त्यांनी कामे केली आहेत. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात ‘यह पुण्य प्रवाह है हमारा’ या महानाट्यचे ते रंगभूषाकार होते. माजी आमदार जयवंत जाधव यांची रावणाची केलेली रंगभूषा खूप गाजली होती. निर्मिती सावंत, अशोक सराफ आदींच्या रंगभूषा नानांनी साकारल्या आहेत. नानांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.

"गांधीनगर येथील रामलीला आमच्यासाठी एक रंगमंच आणि एक रंगभूषेची पिढी आहे. गेली ६७ वर्ष आमचे कुटुंब रंगभूषा करीत आहे. रंगभूषेला नाटय, नृत्य, चित्रपट अशा सर्वच कलाप्रकारात महत्त्व आहे. ऐतिहासिक रंगभूषा करायला मला आवडते. पूर्वी लोकनाट्य, तमाशामध्ये वापरत असलेले नैसर्गिक रंग मी स्वतः तयार करून ते रामलीलेच्या कलावंतांसाठी वापरत असतो."

- नाना (रवींद्र) जाधव (रंगभूषाकार)

Nana Jadhav dressing up Priya Surte who played the role of Sita in Gandhinagar's Ramleela.
Durga Puja Utsav 2022 : गांधीनगरला दुर्गापूजा उत्सवाला सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.