Nana Patole News : राहुल गांधींवरील फ्लाइंग किसचा आरोप हा..... नाना पटोलेंची भाजपावर टीका

Congress leader Nana Patole
Congress leader Nana Patole Esakal
Updated on

Nana Patole News : भारतीय जनता पक्षाच्या विद्वेषाच्या नीतीला सामान्य नागरिक कंटाळले आहेत. त्यातून सामान्यांच्या नजरेतून उतरलेले भाजप सरकार नापास ठरल्यानेच सामान्य नागरिक आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी लोकांना जोडण्याचे काम करीत असल्याने विद्वेषी सरकारकडून त्यांच्या विरोधात कायम षडयंत्र केले जातात. त्यांच्यावरील किसचा आरोपही असाच विद्वेषी षडयंत्राचा भाग असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (nana patole comment on smriti irani statement about rahul gandhi nashik news)

केंद्र सरकारविरोधात क्रांती दिनी काँग्रेस तसेच विविध आदिवासी संघटनांतर्फे बुधवारी (ता. ९) मोर्चा काढण्यात आला. त्यास श्री. पटोले उपस्थित राहिले. त्यानंतर दुपारी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार डॉ. शोभा बच्छाव, ॲड. आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पटोले म्हणाले, की काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर फिरून लोकांना जोडण्याचे काम करीत आहेत. त्याची भाजपला भीती वाटत असल्याने त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले गेले. सत्ताधारी भाजपकडून विद्वेषाचे राजकारण सुरूच आहे.

गुन्हा दाखल करून आधी त्यांची खासदारकी घालविण्याचा प्रयत्न झाला, आता न्यायालयाने झटका दिल्यावर वेगवेगळे आरोप करून राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. मात्र, यातूनही राहुल गांधी सुखरूप बाहेर पडतील. मणिपूरमध्ये अत्याचाराचा आगडोंब उसळला आहे. मात्र, पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Congress leader Nana Patole
Nana Patole: 'आधी आमदार तरी बना.. ', नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर भाजप नेत्याचा टोला

लोकांना समजायला लागलंय...

राज्यात सत्तेत आलेले सरकार हेच मुळात भ्रष्ट मार्गाने आले आहे. सरकारच अशा मार्गाने येणार असेल तर त्याचे पडसाद प्रशासनात दिसणारच. नाशिकला प्रशासनात लाचखोरी ही त्यातून निर्माण झालेली आहे.

कामांच्या नुसत्या घोषणा करायच्या, केंद्रात सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान आश्‍वासने देतात. त्यानंतर कामे न करता केवळ प्रतिमा टिकविण्यासाठी धडपड करतात, हे आता सामान्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे लोकांचा सरकारविरोधात उद्रेक वाढत आहे, तो मतदानातून बाहेर येईलच, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आरक्षण मुद्यातून विद्वेषच

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवून सत्तेचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आधी जातनिहाय जनगणना करा, त्यातून आरक्षणाचे खरे वास्तव पुढे येईल. मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्‍वासन देत भाजपने मत मिळविली, मग केंद्रात सत्ता असताना आरक्षणाची मर्यादा का उठविली जात नाही? सरकारला केवळ मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद पेटवायचा आहे, असे श्री. पटोले यांनी सांगितले.

Congress leader Nana Patole
Smriti Irani : लोकसभा निवडणुकीत पुलाप्रमाणे विरोधकही वाहून जातील - स्मृती इराणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.