कापडणीस पिता-पुत्र हत्याकांड ; आलिशान रेंज रोव्हर बॉलिवूड अभिनेत्याची?

कापडणीस पिता-पुत्र हत्याकांडातील संशयित राहुल जगतापची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे
Kapdanis father-son murder case
Kapdanis father-son murder casesakal
Updated on

नाशिक : कापडणीस पिता-पुत्र हत्याकांडातील संशयित राहुल जगतापची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. त्याच्याकडे असलेली आलिशान कार ही बॉलिवूड अभिनेत्याची असल्याची माहिती दिली. पोलिस या माहितीची खातरजमा करीत आहेत. प्रथमदर्शनी ती त्या अभिनेत्याची आहे हे म्हणणे चुकीचे होईल, असे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने पैशाच्या हव्यासापोटी एकाने पंडित कॉलनी परिसरात ठराविक दिवसांच्या अंतराने वडील आणि मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संशयित आरोपी राहुल जगताप याला ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. धक्कादायक घटनेचा अधिक तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत. यातील मृत नानासाहेब रावजी कापडणीस व अमित नानासाहेब कापडणीस अशी खून झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत. दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळालेल्या राहुल जगताप याच्याकडून घटनेची माहिती घेतली जात आहे.

त्याने खरेदी केलेली आलिशान रेंज रोव्हर कार बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याची असल्याची माहिती संशयित जगताप याने पोलिसांना दिली अशी चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी इन्कार केला आहे. कापडणीस यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या पैशांतून संशयिताने ही गाडी खरेदी केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. जगताप याने कारच्या जुन्या मालकाबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस ‘आरटीओ’कडून गाडीच्या कागदपत्रांची माहिती घेत आहेत. दरम्यान, जगताप याच्या बोलण्यात किती तथ्य असावे, हे मात्र संपूर्ण चौकशीअंती समोर येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत अधिकृतरीत्या कुठलीही माहिती दिलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()