Nashik News: नांदगावला वीजेचा खेळखंडोबा! 2 दिवसापासून वीजपुरवठा सातत्याने खंडित

The ongoing work of shifting eleven KV pole in Nandgaon Lendi river basin.
The ongoing work of shifting eleven KV pole in Nandgaon Lendi river basin.esakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत चालला आहे. यातच नांदगाव शहरात दोन दिवसापासून महावितरणाकडून पावसाळापूर्व कामांच्या नावाखाली दोन दिवसापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

यामुळे उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने नांदगावकर हैरान झाले आहे. (Nandgaon getting electricity Power supply continuously cut since 2 days Nashik News)

नांदगाव शहरात महावितरण विभागाकडून पावसाळी पूर्व काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने वीजवाहिन्यांना अडथळा ठरणारे झाडांच्या फांद्या काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

यासाठी महावितरण विभागाकडून शहरात सकाळी साडेदहा ते सांयकाळी पाचपर्यंत झाडाच्या फांद्या काढण्यासाठी आणि वाहिन्यांची व यंत्रणेची देखभाल दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे संदेश नागरिकांच्या मोबाईलवर टाकले. शनिवारी (ता.१३) शहराच्या पूर्व भागातील येवला रोड,

छत्रपती संभाजीनगर रोड, कैलास नगर, नवे तहसील, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, हमालवाडा, आनंदनगर, नवीन वस्ती, मार्केट यार्ड, विवेकानंद नगर गांधीनगर, मल्हारवाडी, चांडक प्लॉट, भोले नगर, बेलदारवाडी आदी भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.

रविवारी शहराच्या मुख्य भागासह साकोरा रोड मालेगाव-मनमाड रोड भागाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. मात्र दोन्ही दिवस मात्र दिलेली वेळ उलटून देखील रात्री आठ वाजेपर्यंत नांदगाव शहरात वीजेचा पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The ongoing work of shifting eleven KV pole in Nandgaon Lendi river basin.
Nucleus Budget Yojana : न्यूक्लिअस बजेट योजनांच्या लाभासाठी 25 मे पर्यंत मुदत

याबाबत नागरिकांनी विचारपूस केली असता लेंडी नदीपात्रात असलेल्या अकरा केव्ही च्या एका खांबाचे स्थलांतर करण्याचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा रात्री उशिरा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या चार दिवसापासून शहर व परिसरात उन्हाचा पारा चढलेला असून तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या जवळ पोचले आहे. तीव्र उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना त्यात सलग दोन दिवसापासून बत्ती गुल झाल्याने नांदगावकर उकाड्याने नागरिक हैराण झाले.

सोयीनुसार नियोजन

मान्सूनपूर्व कामासाठी किती वेळासाठी वीज खंडित होणार याचा कुठलाही ताळमेळ नसलेल्या महावितरण विभागात ठेकेदारांच्या सोयीनुसार काम करण्याला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे.

महावितरण विभागातील नोंदणीकृत मक्तेदारांना जेव्हा म्हणून मनुष्यबळ मिळते. त्यानुसार महावितरण विभागात देखभाल दुरुस्तीची कामे उरकून घेण्याकडे अधिकाऱ्यांचा कल असतो.

The ongoing work of shifting eleven KV pole in Nandgaon Lendi river basin.
Summer Temperature : नाशिकमधला तापमानाचा पारा 43.6 अंश सेल्सिअसवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.