नांदगाव : मालेगाव-बेगळुरू लिंक महामार्गावर मनमाडजवळ रेल्वे उड्डाणपुलाचा भराव कोसळल्याने वाहतूक वळविल्यानंतर त्याची सर्वाधिक झळ नांदगावकरांना बसली.
अगोदर निकृष्ट दर्जा आणि अरुंद रस्त्यांच्या गर्तेत हरविलेल्या शहरात वाढलेल्या वाहतुकीची वर्दळ व कोंडीमुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहर प्रदूषणाच्या विळख्यात गुरफटले आहे. (Nandgaon in grip of pollution due to increasing traffic police and Highways Authority have not come up with solution Nashik News)
सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरणासह पोलिसांनी त्यावर तोडगा काढता आला नाही. दुसरीकडे रस्त्यावरील वाहतूक नियमनात महत्त्वाची भूमिका असलेले प्रादेशिक परिवहन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मालेगाव परिवहन कार्यालय नेमके काय करते आहे? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
मनमाडजवळ २१ दिवसांपूर्वी रेल्वे उड्डाणपुलाचा भरावाचा काही भाग कोसळला. ही घटना घडल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून पुण्याकडील वाहतूक येवला येथून, तर इंदूरकडून येणारी वाहतूक आणि धुळ्याहून शिर्डी-अहमदनगरकडे जाणारी वाहतूक मालेगाव-चांदवड, लासलगाव, येवला मार्गे तसेच अहमदनगरकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक येवला-विंचूर-लासलगाव-चांदवड-मालेगाव मार्गे असे नियोजन जाहीर करण्यात आले होते.
प्रत्यक्षात मात्र त्यातील बहुतांशी वाहतूक येवला मार्गे मालेगाव अशी सुरू आहे. लासलगाव येथील रेल्वे फाटक बंद व तेथील सब-वे सोयीस्कर नसल्यामुळे ते टाळण्यासाठी येवला मार्गे नांदगाव असा ‘शॉर्टकट' स्वीकारून मालेगावच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीला चालक पसंती देतात.
सर्वाधिक वाहतूक कोंडीचा ‘स्पॉट'
सर्वाधिक वाहतूक कोंडी गंगाधरी चौफुली ते बाजार समितीपर्यंत होत असून अपघातांची संख्या वाढली आहे. २० दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला. शिवाय वाहन उलटणे, खड्ड्यात वाहन अडकणे असे प्रकार वाढले आहेत.
अलीकडे तयार करण्यात आलेल्या ‘हायब्रीड अँन्युइटी' अंतर्गत कौळाणे ते येवला पर्यंतच्या रस्त्याची वाढलेल्या अतिरिक्त वाहतुकीच्या रेट्यामुळे चाळण झाली आहे.
दरम्यान, एकीकडे अतिरिक्त वाहतुकीचा प्रश्न तीव्र स्वरूप धारण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर घाटातील वाहतूक शिऊर बंगला, वैजापूर, येवला व पुढे थेट विंचूरच्या दिशेने जाणे अपेक्षित असताना त्या भागातील अवजड वाहतूक तळवाडे घाटातून जळगाव बुद्रुक अशी वळविण्यात आली.
याही वाहतुकीचा भार कासारी, तळवाडे या भागातील चाळणी झालेल्या रस्त्यावर वाढला आहे. या भागातील दररोज ८ ते १० तास एवढी वाहतूक कोंडी होऊन ७ किलोमीटरपर्यंत वाहनांचा खोळंबा होणे हे नित्याचे झाले आहे.
"छत्रपती संभाजीनगर व नाशिकचे ग्रामीण पोलिस अधीक्षक, परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय साधून वाहतूक कोंडीवर तोडगा काढायला हवा. जळगाव बुद्रुक ते शिऊर बंगलापर्यंतचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून रूपांतरित झाला पाहिजे. वैजापूरच्या वनविभागाचा अडथळा दूर झाल्यास तळवाडे घाट दुरुस्तीचा मुद्दा निकालात निघेल."- सुमीत सोनवणे, संस्थापक, युवा फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.