नांदगाव : गिरणा धरण ते नांदगाव पालिकेच्या जलकुंभापर्यंतच्या मुख्य तसेच उपजलवाहिन्यांमध्ये होणारी गळती व आवर्तनाचा लांबणारा कालावधी यावर शाश्वत पर्याय म्हणून बघितल्या जाणाऱ्या नांदगाव शहर समांतर नळपाणी पुरवठा योजनेला मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे दृष्टीक्षेपात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिसेंबर अखेरीस तालुक्याच्या भेटीवर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या योजनेला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. (Nandgaon new parallel tap water scheme in sight Movement speed up due to CM shinde upcoming visit Nashik Latest Marathi News)
आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मनमाडला करंजवण व मालेगाव, नांदगाव तालुक्यातील ७८ खेडी नळयोजना मार्गी लागल्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव शहराची पाणी समस्या दूर करणाऱ्या नवीन समांतर नळपाणी पुरवठा योजनेला चालना दिली. आता ही योजनाही दृष्टीक्षेपात आल्याने शहरवासीयांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
५५ कोटीहून अधिक खर्चाच्या या योजनेचा प्रस्ताव आता तांत्रिक मान्यतेनंतर प्रशासकीय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आल्याने नववर्षाची शहरवासीयांना ती भेट ठरणार आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरवासीयांसाठी गिरणा धरणातून दरडोई, दर मानसी १३५ या गृहीतकानुसार गिरणा धरणातील पाण्याचे आरक्षण मंजूर झाले होते. आता त्यानंतरच्या प्रशासकीय मंजुरीसाठीच्या फाईलींचा प्रवास सुरु झाला आहे.
गिरणा धरणावरून महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान योजनेतून नांदगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. ५३ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेसाठी २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत मानून योजनेचा प्रकल्पीय आराखडा तयार करण्यात आला आहे. गिरणा धरण ते नांदगाव शहराचे २८.५ किमी अंतर आहे. धरणावर आठ मीटर घेर असणारी उदभव विहीर पाणी उपसा करण्यासाठी बांधण्यात येणार आहे.
पूर्वीच्या ५६ खेडी योजनेतील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असून, समांतर योजनेतील आराखड्यानुसार जवळपास २९ किमी लांबीच्या नव्या अशा ३५० एमएम व्यासाची ‘डीआय- के९’ टाईप पाईपलाईन अंथरण्यात येणार आहे. त्यामुळे व्हॉल्व्ह खराब होणे, गळती वाढणे असे प्रकार त्यातून होणार नाहीत, याची सतर्कता बाळगत योजनेचे आरेखन करण्यात आले आहे.
अद्यावत जलशुद्धीकरणाचे नियोजन
ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील मोकळ्या शासकीय जागेवर स्वतंत्र असे ६० लाख लिटर क्षमतेचे अद्यावत जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे नियोजन या आराखड्यात आहे. लक्ष्मीनगर येथे ३ लाख ६५ हजार लिटर व गुरुकृपा कॉलनी येथे चार लाख लिटर क्षमतेचे दोन नवे जलकुंभ शहरात उभारण्यात येणार आहेत. जेणेकरून पाणी वितरण व्यवस्थेतील सुसूत्रीकरण होऊन सारख्या दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. सध्या नऊ लाख लिटर क्षमेतचे दोन जलकुंभ असून, चाळीस भाग केल्याने २४ तास पाणी वितरण केले जाते. परिणामी, पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नव्या योजनेमुळे राहणार नाहीत.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळेच माझ्या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी समस्या दूर करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळू शकले. त्यामुळे दिलेला शब्द मला प्रत्यक्षात उतरविणे शक्य होऊ शकले." - सुहास कांदे, आमदार, नांदगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.