न्यायडोंगरी (जि. नाशिक) : नार-पार नदी जोड प्रकल्पाला दोन महिन्यात मान्यता मिळणे अपेक्षित आहे. त्यात पश्चिमेला जे ४० टीएमसी पाणी वाहून जाते त्यातील आताच्या डीपीआर मध्ये दहा टीएमसी पाणी वळविण्याचे प्रयोजन आहे.
मात्र यात नांदगाव तालुक्याचा समावेश होण्याचे अपेक्षित असताना डीपीआरमध्ये त्याचा उल्लेख नसल्याने तालुक्यात नाराजीचा सूर उमटत आहे. (Nandgaon omitted in river linking project There tone of displeasure as it is not mentioned in DPR Nashik News)
विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात दुष्काळी भागात पाणी वळविणे हे नदी जोड प्रकल्पाचे मुख्य काम आहे. या योजनेनुसार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव या तालुक्यांचा समावेश होता. नांदगाव तालुका हा अती तुटीच्या क्षेत्रात आहे.
त्यामुळे या योजनेत नांदगाव तालुक्यात समावेश व्हावा म्हणून चार वर्षापूर्वी माजी आमदार अनिल आहेर, समाधान पाटील व त्यांचे सहकारी यांनी प्रस्तावित योजनेत डीपीआर मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी राज्यस्तरावर व केंद्रस्तरावर ह्या विषयाची मुद्देसूद तांत्रिक मांडणी केली होती.
या संदर्भात तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांची भेट समाधान पाटील व यांच्या सहकार्याने दिल्लीत भेट घेऊन हा विषय गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिला होता.
तेव्हा केंद्रीय जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे यांना गडकरी यांनी यांच्या निर्देशानुसार तत्कालीन राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस चहल व संबंधित अधिकारी वर्गांना निर्देश दिले होते.
यामुळे नांदगाव तालुक्याचा समावेश प्रकल्प अहवालात अंतर्भाव होण्याचा मार्ग खुला झाला होता. श्री. पाटील यांच्या मागणीनुसार ७५ ते ८० गावातील शेती सिंचनाखाली येऊन हा प्रकल्प नांदगाव तालुक्याला वरदान ठरणारा होता.
तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पाची साठवण क्षमता १.५ टीएमसी आहे. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता व साठवण क्षमता दोन टीएमसी ने वाढविण्याबाबत वेगवेगळे पर्याय सुचविण्यात आले होते.
२०१९ साली गडकरी यांचे खाते तर राज्यात सत्तांतर झाले. योजना राबविण्याबाबत काही त्रुटी लक्षात आल्याने हा प्रकल्प राज्याने स्वखर्चाने राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.
तालुक्यात नाराजीचा सूर
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर नार-पार नदी जोड प्रकल्पाला गती मिळाली आहे. यासाठीचा डीपीआर देखील अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र नांदगाव तालुक्याचा डीपीआर मध्ये समावेश नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे तालुक्यातील सर्व स्तरातून प्रयत्न होऊनही व जिल्ह्यातील या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वपक्षीय नेते मंडळींनी नांदगावचा नार पार योजनेत समावेश होणे याबाबत नेहमी सकारात्मक भूमिका घेतली असतानाही अतितुटीच्या खोऱ्यामध्ये नांदगाव तालुक्याचे नाव अग्रस्थानी असतानाही त्याचा समावेश याबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी सर्व स्तरातून मागणी करण्यात येत आहे.
"विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात पाणी वळवणे ही नदी जोड प्रकल्पाचे मूळ तत्व आहे. नांदगाव तालुक्यातील सिंचन क्षमता अवघी पाच टक्के आहे. नार पार नदी जोड प्रकल्पात नांदगावचा समावेश प्राधान्याने होणे गरजेचे आहे, या दृष्टीने आम्ही सकारात्मक मांडणी करून वस्तुस्थितीची जाणीव वरिष्ठ स्तरावर यापूर्वीही करून दिले आहे."
- ॲड. अनिल आहेर, माजी आमदा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.