Nashik News : शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासोबतच पर्यटनाला चालना मिळणाऱ्या शिवसृष्टीच्या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात साकारण्यात येणारी शिवसृष्टी म्हणजे शिवप्रेमींसह जनतेला आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे अनोखा नजराणा मिळाला आहे.
शिवसृष्टीसाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून दोन कोटींचा निधी मिळाल्याने त्यातून सध्या नियोजित शिवसृष्टी च्या संरक्षक भिंतीचे बांधकाम जोरात सुरु आहे. (Nandgaon Shiv Srishti work on progress nashik news)
आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगावला शिवसृष्टी उभारली जात आहे. या कामास सुरवात देखील झाली आहे. संरक्षण भिंतीच्या उजव्या बाजूच्या साडेचार मीटर उंचीच्या भिंतीवर आतल्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवकालीन इतिहास, संस्कृती, व पारंपारिक वारसा आणि अनुभव प्रतिबिंबित करणारा व प्रेरणादायी सौंदर्यानुभव देणारे म्युलरची चित्रे काढली जाणार आहेत.
संरक्षक भिंतीसह म्यूरल चित्रकलेतील उठावदार शिल्पे साकारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिवसृष्टीसाठी शासनाकडून नव्याने पुन्हा तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या कामातून शिवसृष्टीचे प्रवेशद्वार, त्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा २९ फूट उंचीचा पूर्णाकृती ब्राँझ धातूतील अश्वारूढ पुतळा व त्यासभोवताली कारंजासह नैसर्गिक हिरवळीचे देखणे उद्यान या अन्य कामांना देखील गती देण्यात आली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा त्याच्या भव्यदिव्यतेमुळे लक्षवेधी ठरणार आहे. यासह या शिवसृष्टीत शिवकालीन ऐतिहासिक प्रतिकृतींचे संग्रहालय, शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील ग्रंथसंपदा असलेले वाचनालय, त्याजोडीला सिक्स डी ॲम्फी थिएटर्स उभारण्यात येत असल्याने महाराजांच्या जीवनावरील स्फूर्ती देणाऱ्या चित्रपटांचे प्रक्षेपण अशी संकल्पना या सिनेमागृहामागे ठेवण्यात आली आहे.
प्रवेशद्वारासह अन्य ठिकाणी करण्यात येणाऱ्या बांधकामासाठी मराठवाड्यातून विशिष्ट ठेवणीतले दगड वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुरातन काळातील स्थापत्य शास्त्राची आठवण होणार आहे.
"छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते शहरातील शिवस्फूर्तीच्या नूतनीकरण झाले. तेव्हा राजेंना शिवप्रेमींना आपण आकर्षक व भव्य अशी शिवसृष्टी निर्माण करण्याचा जाहीर शब्द दिला होता. आता त्याची पूर्तता होत असल्याचा शिवप्रेमी म्हणून मलाही समाधान वाटत आहे. लवकरच हे कामकाज देखील पूर्ण होईल." - आमदार सुहास कांदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.