Nashik News : कामयानीसह जनता व कुशीनगर एक्सप्रेसचे नांदगावचे थांबे पूर्ववत

Express
Expressesakal
Updated on

नांदगाव (जि. नाशिक) : कोरोना काळात नांदगावच्या रेल्वे स्थानकात काढून घेण्यात आलेल्या जनता गोरखपुर, कृषी नगर व कामयानी एक्स्प्रेस या तीन गाडयांना ८ एप्रिलपासून नांदगाव रेल्वे स्थानकांमध्ये पुन्हा थांबे मंजूर करण्यात आले आहेत.

श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नांदगावकरांना तीन गाड्यांच्या थांब्याची भेट दिल्याने प्रवासी आणि नांदगाववायियांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. (Nandgaon stops of Janata and Kushinagar Express restored with Kamayani Nashik News)

कोरोना काळ सुरु असताना नांदगाव रेल्वे स्थानकाच्या वेळापत्रकात एकूण अकरा गाड्यांचे थांबे होते. कोरोनाचे वातावरण निव्वळल्यानंतर गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्यात आले नव्हते. रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत होत नसल्याने प्रवासी वर्गात मोठा असंतोष होता.

याबाबत नांदगावकरांनी वेळावेळी पाठपुरावा केला होता. मात्र त्यांना यश येत नव्हते. केंद्रीय आरोग्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

मात्र भुसावळ विभागातील रेल्वे अधिकारी रेल्वे बोर्डाला प्रतिकूल अभिप्राय कळवीत नसल्याने काढून घेण्यात आलेले थांबे मंजूर होत नव्हते अखेर डॉ.पवार यांच्या प्रयत्नाला यश आले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक भूमिका घेत नांदगाव स्थानकावर रेल्वेप्रशासनास रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी आदेश दिले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Express
Market Committee Election: स्थगिती हटविल्याने ‘त्या’ 78 संचालकांची नावे वगळणार! पुढील सुनावणी 10 एप्रिलला

रेल्वे बोर्डाचे संयुक्त निदेशक विवेक कुमार सिन्हा, यांनी त्याबाबतचे अधिकृत आदेश आज काढण्यात आले आहे. त्यानुसार आता नांदगाव रेल्वे स्थानकावर पटणा लोकमान्य टिळक जनता एक्सप्रेस (१३२०१/०२), लोकमान्य टिळक बनारस एक्सप्रेस (११०७१/७२) व लोकमान्य टिळक गोरखपुर कामयानी एक्सप्रेस (२२५३७/३८) या रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर करण्यात आले. ८ एप्रिल २०२३ पासून तीन एक्स्प्रेस गाड्या आता पूर्ववत थांबणार आहे.

"केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने नांदगावला एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करण्यात आले आहे. सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा. थांबे मंजूर झाल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय आता दूर होणार आहे." -डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री,

"डॉ. भारती पवार यांच्यासह रेल्वे बोर्डाकडे अनेकदा पाठपुरावा केला आता अकरापैकी आठ थांबे मजूर झाले असले तरी झेलम गाडीला पूर्ववत थांबा मिळावा तसेच भुसावळ पुणे या गाडीला देखील थांबा देण्यात यावा." - सुमीत सोनवणे, संस्थापक युवा फाउंडेश

Express
Amruta Pawar : पक्षाने आदेश दिल्यास जिल्ह्यात कुठेही लढणार! : अमृता पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.