नांदगाव (जि. नाशिक) : शहरातील न्यू इंग्लिश स्कूलपासून ते बसस्थानक पावेतोच्या तयार करण्यात आलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय काढण्यात आला नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. (Nandgaon traffic jam due to narrow road Nashik News)
विशेषतः नव्या हायवेच्या वळणावरील अरुंद रस्ता व त्यावरील धावणारी वेगवान वाहने यामुळे जीव मुठीत घेत रस्ता क्रॉसिंग करावे लागत आहे. जळगाव-मनमाड-चांदवड हा नवा राष्ट्रीय महामार्ग शहरातून काढताना मूळ प्रकल्पीय अहवालात नमूद करण्यात आलेली रस्त्याची प्रत्यक्षात दिसणारी रुंदी शहरात झाली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा हायवे नागरिकांच्या गैरसोयीत भर टाकणारा ठरला आहे.
शहरात ज्या ठिकाणी नागरी वसाहती संलग्न आहेत त्याचा विचार न करता वेगवान वाहनांची वर्दळ आता नवी समस्या बनली आहे. हनुमाननगरजवळ वाहतुकीची रहदारी वेगवान असूनही याठिकाणी रुंबल्स टाकणे गरजेचे असताना त्याकडे महामार्ग विभागाला त्याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
वळण रस्त्यावर टाकण्यात आलेले रेडियमचे कॅट आईज कधीच निखळून पडल्याने बहुतांशी वाहनचालक वळणावर आपल्या वाहनाचा वेग कमी करीत नसतात. वास्तविक, या ठिकाणापासून सुरू होणारा हायवे बसस्थानकपावेतो अरुंद स्थितीत सोडून देण्यात आला आहे. वाहतूक नियमनाकडे वाहनधारकांचे होणारे दुर्लक्ष यावर महामार्ग प्राधिकरण विभागाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.