Nashik BJP News: भाजपच्या कार्यकारिणीत नांदगावकरांचा वरचष्मा! संजय सानपांवर सरचिटणीसपदाची धुरा

Sanjay Sanap
Sanjay Sanapesakal
Updated on

Nashik BJP News : भारतीय जनता पक्षाच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीत नांदगाव तालुक्याला झुकते माप देण्यात आले आहे. येथील भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते संजय सानप यांची पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी कार्यकारिणीची घोषणा केली असून त्यात पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हा महामंत्री असलेल्या संजय सानप यांच्यावर आता जिल्हा सरचिटणीसपदाची धुरा सोपविण्यात आल्याने त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे. (Nandgaonkars dominate BJP executive General secretary post on Sanjay sanap Nashik political News)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

अठ्ठावन्न जणांच्या जिल्हा कार्यकारिणीत एकूण दहा उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून त्यात नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथील सोनाली पाटील यांचा समावेश आहे.

जिल्हा सरचिटणीस पदासाठी सहा जणांची नियुक्ती करण्यात आली त्यात नांदगावमधून संजय सानप यांचा समावेश करण्यात आला.

Sanjay Sanap
Nashik: येवला, नांदगाव मधील पोलिस पाटील आरक्षण जाहीर; 26 सप्टेंबरपासून भरतीसाठी ऑनलाइन अर्जाला सुरवात

तेरा जणांच्या चिटणीस मंडळात मनमाडचे नारायण फुलवानी व भालूरचे विक्रम निकम यांचा समावेश आहे. जिल्हा कार्यकारिणीत अशोक पेंढरकर, जयकुमार फुलवानी, मुकेश पाटील, राजेंद्र आहेर, रामचंद्र दुकळे यांचा समावेश आहे

जिल्हाध्यक्ष वाघ यांनी सर्व समाजघटकांना सामावून घेत नियुक्त करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला थेट जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. जयश्रीताई दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यासह जिल्ह्यात सर्वसमावेशक पक्षीय संघटनात्मक काम करू अशी प्रतिक्रिया श्री. सानप यांनी निवडीनंतर व्यक्त केली.

Sanjay Sanap
Nashik News: भुयारी गटारीला मुहूर्त कधी लागणार? निविदा उघडण्यास विलंब संशयास्पद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.